Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : एसटीची डिजिटल मोहीम ; एनसीएमसी कार्डाची नोंदणी नसल्याने खेड्यात उडाला पुरता फज्जा

शनल कॉमन मोबिलिटी कार्ड' कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी भागात लोकप्रिय ठरत असताना, ग्रामीण भागात मात्र या मोहिमेचा पुरता फज्जा उडाल्याचे समोर आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 09, 2026 | 06:02 PM
Kolhapur News : एसटीची डिजिटल मोहीम ; एनसीएमसी कार्डाची नोंदणी नसल्याने खेड्यात उडाला पुरता फज्जा
Follow Us
Close
Follow Us:
  • एसटीची डिजिटल मोहीम
  • एनसीएमसी कार्डाची नोंदणी नसल्याने खेड्यात उडाला पुरता फज्जा
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेले ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी भागात लोकप्रिय ठरत असताना, ग्रामीण भागात मात्र या मोहिमेचा पुरता फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. गेल्या १५ दिवसांत विभागात ३ हजार २४२ कार्डाची नोंदणी झाली असली, तरी त्यातील बहुतांश वाटा हा केवळ शहरी आगारांचाच आहे. विशेष म्हणजे, जिल्हयातील ६ प्रमुख आगारांमध्ये अद्याप एकाही कार्डाची नोंदणी झालेली नाही, ज्यामुळे एसटीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शहरी आगारांची ‘डिजिटल’ भरारी
शहरातील प्रवाशांनी सुट्या पैशांच्या कटकटीतून
मुक्त होण्यासाठी या स्मार्ट कार्डला भरघोस प्रतिसाद दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरी आणि निमशहरी आगारांनी मोठी मजल मारली आहे. शहरी भागात तंत्रज्ञानाचा वापर आणि जनजागृती अधिक असल्याने प्रवाशांनी रांगा लावून कार्डाची नोंदणी केल्याचे चित्र आहे.
संभाजीनगर आगारः ८६२ (विभागात प्रथम)
कोल्हापूर आगारः ८२५ (द्वितीय)
इचलकरंजी आगारः ४६४
गडहिंग्लज आगारः ६२९
राधानगरी आगारः ३९४

Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद

सुट्या पैशांचा वाद मिटवण्यासाठी कार्ड
एसटी प्रवासात पाच दहा रुपयांच्या सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद ग्रामीण भागातील लांब पल्ल्याच्या बसमध्ये नित्याचेच आहेत. हे कार्ड या वादावर कायमस्वरूपी तोडगा ठरू शकते. ग्रामीण जनता अद्यापही पारंपरिक ‘रोख’ व्यवहारावरच अवलंबून असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ग्रामीण भाग अद्याप ‘ऑफलाईन’च; आगार व्यवस्थापनाचे अपयश

एकीकडे शहरात डिजिटल क्रांतीची चर्चा असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातील सहा आगारांची आकडेवारी पाहून प्रशासन हादरले आहे. मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, गगनबावडा आणि आजरा या सहा आगारामध्ये नोंदणीचा आकडा अद्याप ‘शून्य’ आहे. कागल आणि आज-यासारख्या प्रगत तालुक्यांतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात, तरीही तिथे एकाही कार्डाची नोंदणी न होणे हे आगार व्यवस्थापनाचे अपयश मानले जात आहे. ग्रामीण प्रवाशांना या योजनेची माहितीच नाही की आगारातील यंत्रणा सुस्त आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

नियंत्रकांचे कडक आदेश
मोबिलिटी कार्ड ही महामंडळाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. शहरी भागात मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे, मात्र ग्रामीण भागातील ६ आगारांची कामगिरी शून्य असणे है चिंताजनक आहे. या आगारांच्या व्यवस्थापकांन आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ग्रामीण प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर हेल्प डेस्क सुरू करण्यात आल असून, येत्या आठवडचात या सर्व आगारांचे खात उघडले जाईल याची खबरदारी आम्ही घेत आहोत.
अभय देशमुख, विभाग नियंत्रक, कोल्हापूर

Kolhapur News : कोकण ते कोल्हापूर प्रवास आता होणार सोपा; रोजगार हमी योजनेतून विकासकामाला गती

Web Title: Kolhapur news sts digital campaign there was a lot of chaos in the village due to lack of ncmc card registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद
1

Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ
2

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम
3

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम

Kolhapur News :  वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा
4

Kolhapur News : वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.