Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur ZP Election 2026: कोल्हापूरमधील ‘मिनी मंत्रालय’ महायुतीच्या ताब्यात, काँग्रेसच्या बंटी पाटलांची कडवी झुंज

पन्हाळा जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडून आलेल्या सहा सदस्या पैकी केवळ एक सदस्य जनसुराज्य पक्षाचा तीन राष्ट्रवादी पक्षाचे व दोन सदस्य शिवसेना शिंदे गटाचे आल्याने जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला ढासळला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 10, 2026 | 10:06 AM
Kolhapur ZP Election 2026:

Kolhapur ZP Election 2026:

Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीने वर्चस्व
  • ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची न राहता राजकीय शक्तिपरीक्षाच ठरली होती
  • वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नियोजनपूर्वक उमेदवार उभे करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले
 

Kolhapur ZP Election 2026:  कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीने वर्चस्व स्थापन केल्यानंतर मिनी मंत्रालय महणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, भाजपाला शह देत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाने २० जागा राखून घवघवीत यश मिळविले आहे. त्या खालोखाल काँग्रेसने १५ जागा आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. भाजपाला १२. तर शिंदे सेनेला ८ जागांवर समाधान मानावे लागले. एकंदरीत पक्षीय बलाबल पाहता कोल्हापूर जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात राहणार हे निश्चित झाले आहे.

गतवेळचे बलाबल २०१७ भाजप १४, काँग्रेस १४, राष्ट्रवादी-११ शिवसेना १०, आधाडी, अपक्ष व इतर १९ अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने  उत्साहाने सहभाग नोंदवत तब्बल ७४.४५ टक्के मतदान केले. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. १२ तालुक्याच्या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.

Maharashtra Politics: राज्यात राजकीय भुकंपाचे संकेत; मुख्यमंत्र्यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना

या निवडणुकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सतेज पाटील, खा. धनंजय महाडिक यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदार, जिल्ह्यातील प्रस्थापित नेते आणि नवोदित उमेदवार अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ता पणाला लागली होती. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची न राहता राजकीय शक्तिपरीक्षाच ठरली होती. निकालांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. (Panchayat Samiti Election) 

मुश्रीफ यांनी सर्वाधिक उमेदवार निवडून आणले

महायुतीतील घटक पक्षांसह आघाडीचे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे महायुती संघटित राहिली तर जिल्हा परिषदेत सतांतर होणार असून महायुती सत्तेवर येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नियोजनपूर्वक उमेदवार उभे करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहेत, कधी नव्हे ते जनसुराज्यचे संस्थापक आ. विनय कोरे यांच्या पन्हाळा, शाहूवाडी मतदारसंघात उमेदवार उभे करत चौघांना निवडून आणले आहे.

तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ

चंदगडमध्ये भाजपला पाठिंबा दिलेले आ. शिवाजीराव पाटील यांना राष्ट्र‌वादी काँग्रेसकडून चक्का बसला आहे. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना त्याच्या मतदारसंघातील राधानगरी तालुक्यात काँग्रेसने धक्का दिला आहे. महापालिके पाठोपाठ जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकला आहे, असे असले तरी काँग्रेस दोन नंबरचा पक्ष ठरला.

 

पन्हाळ्यात काय आहे परिस्थिती?

पन्हाळा जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडून आलेल्या सहा सदस्या पैकी केवळ एक सदस्य जनसुराज्य पक्षाचा तीन राष्ट्रवादी पक्षाचे व दोन सदस्य शिवसेना शिंदे गटाचे आल्याने जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला ढासळला. पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदासाठीची मत मोजणी सोमवारी सकाळी नगरपरिषदेच्या सांस्कृतिक सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपन्न केली यात सातवे, कोडोली, पोलें तर्फ ठाणे, यवलुज, कळे, कोतोली हे जिल्हा परिषद मतदार संघ व त्यात येणारे बारा पंचायत समिती मतदार संघ यातील मतमोजणी पार पडली.

अत्यंत चुरशीची व अटीतटीची अशी मतमोजणी झाली यात राष्ट्रवादीच्या पोलें तर्फ ठाणे, यवलूज, सातवे मतदार संघातील सदस्य निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाचे सदस्य कोतोली, यवलूज येथे निवडुन आले तर कोडोली येथे अपक्ष अमरसिंह पाटील हे निवडून आले व एकमेव कळे जिल्हा परिषद मतदार संघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार निवडून आले. पंचायत समिती सदस्य पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे चार, राष्ट्रवादी पक्षाचे चार व जनसुराज्य पक्षाचे चार उमेदवार निवडून आले सभापती पद सर्वसाधारण असल्याने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे संकेत आमदार चंद्रदीप नरके यांनी दिल्याने जनसुराज्य पक्ष पन्हाळा पंचायत समिती मध्ये विरोधी बाकावर बसणार असल्याने सत्ता हातातून गेल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 

Web Title: Kolhapur zp election 2026kolhapur zilla parishad in the hands of mahayuti congress bunty patil in a tight fight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 10:06 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.