Kolhapur Local Elections: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्यात कोल्हापुरच्या राजकीय वर्तुळातही अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापुर काँग्रेसचा मोठा गट शिंदे सेनेने गळाला लावल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, येत्या रविवारपर्यंत हा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन-चार दिवसांपूर्वीच काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर येत्या रविवारपर्यंत शारंगधर देशमुख यांच्यासह जवळपास ३५ जणांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यानंतही अनेक जण टप्प्याटप्प्याने शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या ३५ जणांमध्ये शारंगधर देशमुख यांच्यासह १२ माजी नगरसेवक आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्याचा समावेश आहेत.
कोल्हापूर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेनेने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकनात शिंदेंनी कोल्हापुर महापालिका निवडणुकीची जबाबदार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सोपवली आहेत. माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामार्फत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक-एक करून गळाला लावण्याचे काम सुरू आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी यापेक्षा मोठ्या घडामोडींचा इशारा दिला आहे. त्यांनी दावा केला आहे की, आगामी काळात काँग्रेसमधील आणखी ३५ पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
World Vitiligo Day: विटिलिगोबाबत गैरसमज, जागरुकता महत्त्वाची; संसर्गजन्य आजार नाही तर
या यादीत दोन माजी महापौर, उपमहापौर आणि महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशा महत्त्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी अनेकांचे पक्षप्रवेश रविवारपर्यंत होणार असून, हा पहिला टप्पा असेल. त्यानंतर दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांचाही टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये प्रवेश सुरू राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात लवकरच मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.