Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ichalkaranji Mayor : वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच

महाराष्ट्राचे मॅंचेस्टर असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीचा पहिला महापौर कोण? याची उत्सुकता दिवसागणिक वाढतच चालली आहे. पण ‘पद एक अन् इच्छुक २७’ असे मोठे कोडे नेतेमंडळींसमोर उभे ठाकले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2026 | 05:20 PM
वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच

वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच

Follow Us
Close
Follow Us:
  • वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण?
  • अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच
  • निकटवर्तीयासह अनुभवी शर्यतीत
इचलकरंजी/हुसेन शेख : महाराष्ट्राचे मॅंचेस्टर असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीचा पहिला महापौर कोण? याची उत्सुकता दिवसागणिक वाढतच चालली आहे. पण ‘पद एक अन् इच्छुक २७’ असे मोठे कोडे नेतेमंडळींसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे पहिला मान आपल्यालाच मिळावा, यासाठी स्वतः गाठीभेटी घेण्यासह शिष्टमंडळाच्या माध्यमातून नेत्यांची कृपादृष्टी आपल्यावरच व्हावी, यासाठी मनधरणी केली जात आहे. त्यामुळे कोणाची लॉटरी खुलणार याबाबत तर्कवितकांना ऊत आला आहे. शहराचा ‘पहिला नागरिक’ बनण्यासाठी अनुभवी सदस्यांसह नवख्या आणि मर्जीतील सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

 

नुकत्याच झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा ४३ जागांसह अग्रस्थानी राहिला, तर महायुतीमधीलच शिवसेना शिंदे गटाला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १ जागा मिळाली. त्यामुळे ४७ जागांसह सत्तेची सूत्रे भाजपाच्या हाती आली आहेत.

ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्यांमध्ये योगेश पाटील, सतिश मुळीक, प्रदीप धोत्रे, नितेश पोवार, राजू पुजारी, सुशांत कलागते, किरण खवरे, प्रमिला जावळे, रुपा बुगड, ध्रुवती दळवाई, विद्या साळुंखे, रुपाली सातपुते, सपना भिसे आणि पुनम माळी यांचा समावेश आहे. तर ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र असलेल्यांमध्ये भाजपमधील तानाजी पोवार, जुलेखा पटेकरी, विठ्ठल चोपडे, उदय धातुडे, सारीका पाटील, अभिषेक वाळवेकर, ओंकार सुर्वे, मनिषा कुपटे, मोनाली मांजरे, वैशाली मोहिते, शशिकला कवडे आणि शिवसेना शिंदे गटाच्या सरीता आवळे यांचा समावेश आहे.

निकटवर्तीयासह अनुभवी शर्यतीत

ओबीसी प्रवर्गातून विजयी सदस्यांमध्ये नवख्यांची संख्या जास्त आहे. तर पडताळणी प्रमाणपत्र असलेल्यांपैकी तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे, सरिता आवळे अनुभवी सदस्य असून, यामध्ये अभ्यासू म्हणून विठ्ठल चोपडे यांना संधी मिळू शकेल. नवोदित सदस्यांचा विचार झाल्यास प्रामुख्याने नितेश पोवार, सतिश मुळीक या आमदार राहुल आवाडे यांच्या निकटवर्तीयांच्या नावाची चर्चा होईल. नितेश पोवार यांनी प्रभाग १२ मध्ये दोन माजी उपनगराध्यक्षांना पराभूत करण्यासह सहकाऱ्यांच्या मदतीने भाजपचे संपूर्ण पॅनेल निवडून आणण्यात यश मिळविले आहे. शिवाय तरुण उद्योजक अभिषेक वाळवेकर, रुपा बुगड, सपना मिसे, उदय धातुंडे, सुशांत कलागते यांचाही विचार होऊ शकतो.

नेत्यांची कृपादृष्टी कोणावर पडणार?

ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या सदस्यांची संख्या १४ तर इतर प्रवर्गातून विजयी झालेले पण ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र असलेले १३ सदस्य आहेत. त्यामुळे या २७ जणांमधून कोणाची लॉटरी निघणार याकडे लक्ष लागले आहे. शिवाय तिन्ही नेत्यांची कृपादृष्टी यापैकी कोणावर पडणार आणि पहिल्या महानगरपालिकेचा पहिला महापौर बनण्याचा मानकरी कोण ठरणार? या चर्चेला रंग चढू लागला आहे.

१४ सदस्यांना महापौर पदाची संधी

पहिले महापौरपद ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या प्रवर्गातून कमळ चिन्हावर विजयी झालेल्या ८ महिला आणि ६ पुरुष अशा १४ सदस्यांना महापौर पदाची संधी आहे. परंतु अन्य प्रवर्गातून विजयी होऊनही ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र असलेले १३ सदस्यही महापौरच्या शर्यतीत आल्याने महायुतीकडील संख्या २७ झाली आहे.

Web Title: Everyones attention is on who will be the mayor of ichalkaranji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Ichalkaranji

संबंधित बातम्या

Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम
1

Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम

Latur Political News: औसात ‘उबाठा’ सेनेला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते BJP च्या वाटेवर
2

Latur Political News: औसात ‘उबाठा’ सेनेला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते BJP च्या वाटेवर

मायणी गटात कोण कोणाला चेकमेट देणार? लढत चौरंगी होणार की दुरंगी? ‘या’ तारखेला होणार स्पष्ट
3

मायणी गटात कोण कोणाला चेकमेट देणार? लढत चौरंगी होणार की दुरंगी? ‘या’ तारखेला होणार स्पष्ट

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!
4

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.