Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायणी गटात कोण कोणाला चेकमेट देणार? लढत चौरंगी होणार की दुरंगी? ‘या’ तारखेला होणार स्पष्ट

मायणी गटात कोण कोणाला चेकमेट देणार? मायणी गटात हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2026 | 06:10 PM
मायणी गटात कोण कोणाला चेकमेट देणार? लढत चौरंगी होणार की दुरंगी? 'या' तारखेला होणार स्पष्ट

मायणी गटात कोण कोणाला चेकमेट देणार? लढत चौरंगी होणार की दुरंगी? 'या' तारखेला होणार स्पष्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • मायणी गटात कोण कोणाला चेकमेट देणार?
  • लढत चौरंगी होणार की दुरंगी?
  • ‘या’ तारखेला होणार स्पष्ट
मायणी/मारुती पवार : सध्या मायणी गटाचा विचार केला तर जिल्हा परिषदेसाठी ओबीसी पुरुष आरक्षण असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुरेंद्र गुदगे यांनी अर्ज भरला असून, भारतीय जनता पार्टी कडून (कुणबी दाखला जोडून) सुरज पाटील यांनी अर्ज भरला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून पी . डी .सावंत (कुणबी दाखला जोडून) यांनी अर्ज भरला आहे. शेखर गोरे गटाचे राजू झगडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. जरी चार उमेदवारांनी अर्ज भरला असला तरी येणाऱ्या 27 तारखेला खरे चित्र स्पष्ट होऊन खरी लढत कोणाच्यात होणार येत्या दोन दिवसात समजेल. कोण कोणाला चेकमेट देणार? त्यामुळे मायणी गटात हाय व्होल्टेज ड्रामा पहावयास मिळणार आहे.

 

सध्याच्या घडीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरेंद्र गुदगे हे कसलेले उमेदवार असून, तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत त्यामुळे या गटावर त्यांची मोठी पकड पहावयास मिळते. जिल्हा परिषद गटात कोट्यावधी रुपयांची त्यांनी विकास कामे केली असून, प्रत्येक गावागावात विकास कामाचा त्यांनी डोंगर उभा केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी सध्याच्या घडीला सुरेंद्र गुदगे यांचे पारडे जड दिसत असले तरी नव्याने इनिंग सुरू करणारे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरज पाटील यांचेही पारडे जड दिसत आहे त्यांना पक्षाची मोठी साथ लाभणार असून, त्यांच्याबरोबर माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांचा अनुभव कामी येणार आहे. डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांचे या गटातील गावागावात त्यांचेही अनेक कार्यकर्ते असल्यामुळे आणि सद्यस्थितीला मंत्री जयकुमार गोरे यांचा वरदहस्त सुरज पाटील यांच्या डोक्यावर असल्यामुळे सध्याच्या घडीला तरी सुरेंद्र गुदगे यांना टफ फाईट द्यावी लागेल.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पि. डी .सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पि. डी. सावंत हे हिवरवाडी गावचे रहिवासी असून, त्यांनी गावाचे नेतृत्व केलेले आहे. सामाजिक कार्याची आवड असणारे सावंत हे राजकीय पटलावर उगवता तारा म्हणून मायणी गटात आपले नशीब आजमावत आहेत. ते एक या भागातील निष्णात वकील म्हणून नावारुपाला आलेले आहेत. आपल्या वकिली व्यवसायातून मायणी गटात त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून, अनेक गोरगरीब लोकांच्या केसेस त्यांनी विना मोबदला लढलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात मोठी सहानभूती असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत त्याचा फायदा नक्कीच होईल. परंतु त्याचा अर्ज राहणार की काढून घेणार? हे 27 तारखेलाच समजेल. जर त्यांचा अर्ज राहिला तर ते जॉईंट किलर म्हणून प्रस्थापितांना मोठा धक्का देऊ शकतात.

शेखर गोरे गटाचे राजुशेठ झगडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, आपणही या रेसमध्ये असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. मी ओबीसी असून ही निवडणूक लढवित आहे. ओबीसी समाज आपल्याच पाठीशी उभा राहून आपल्याला मतदान करेल व मायणी गटाचे नेतृत्व करण्याची मला संधी देईल, असा विश्वास राजूशेठ झगडे यांना वाटत आहे. परंतु वरिष्ठ लेवलला काही खलबत्ते होऊन राजू शेठ झगडे यांचा अर्ज कायम राहणार की निघणार हेही पाहणे रंजक ठरेल त्यामुळे मायणी गटात सध्याच्या घडीला तरी कोण कोणाला चेकमेट देणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लावणार, या प्रकल्पामुळे…; अजित पवार यांनी दिली माहिती

Web Title: Vigorous campaigning is underway by all parties for the zilla parishad elections in the mayini group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • BJP
  • MP Sharad pawar
  • Satara
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग
1

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!
2

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?
3

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?

कोल्हापूरमध्ये बंडखोरीचा भडका; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षीय नेतृत्वासमोर आव्हान
4

कोल्हापूरमध्ये बंडखोरीचा भडका; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षीय नेतृत्वासमोर आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.