सिद्धनेर्ली येथील मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीवर झाड कोसळून सुमारे तीन लाख रुपयांचे तर अलाबाद येथील नियाज देसाई यांच्या मटन दुकानावर झाड पडून सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बेलेवाडी मासा येथील बळवंत गोरुले यांच्या दहा गुंठे आंबा बागेचे नुकसान झाले आहे. तसेच विश्वास पाटील यांचे शेतघर, जनावरांचा गोठा पडून पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विलास पाटील यांच्या काजू कारखान्याचे एक लाख २५ हजाराचे नुकसान झाले आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल; महाराष्ट्राच्या वेशीवर केव्हा येणार ?
देशभरात पूर्वमान्सूनला सुरुवात झाली असून मान्सून केरळमध्ये दाखल कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार वळवाचा पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज होता, तो खरा ठरला आहे. या वर्षी गेल्या १६ वर्षांमध्ये केरळमध्ये सर्वात लवकर मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. केरळच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.