Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांवर थेट हल्ले होत आहेत, तर शेळ्या-गाई ठार होतायेत, पिकांची अक्षरशः राखरांगोळी होत आहे. रात्री मेहनतीने जपलेली शेती सकाळी उठून पाहिल्यावर उद्ध्वस्त झालेली असते.  

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 30, 2025 | 06:05 PM
Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

Follow Us
Close
Follow Us:

पन्हाळा तालुक्यात बिबट्या वन्य प्राण्यांची दहशत
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 
शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

बाजारभोगाव: पन्हाळा तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या दहशतीखाली दबला आहे. बिबट्या, गवा रेडे, कोळशिंदा यांचा मोकाट संचार शेतशिवारापुरता मर्यादित राहिला नसून आता तो गाववस्त्यांपर्यंत पोहोचला आहे. हातात कुदळ-कोयता घेऊन शेतात जाणारा शेतकरी आज जिवाच्या भीतीने घराबाहेर पडताना मागे वळून पाहतो. शेतात गेलेला शेतकरी घरी जिवंत परत येईल, याचीही शाश्वती उरलेली नाही.  इतकी भयावह परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांवर थेट हल्ले होत आहेत, तर शेळ्या-गाई ठार होतायेत, पिकांची अक्षरशः राखरांगोळी होत आहे. रात्री मेहनतीने जपलेली शेती सकाळी उठून पाहिल्यावर उद्ध्वस्त झालेली असते.  शेतकऱ्याच्या रक्ताच्या घामावर उगवलेले पीक वन्य प्राणी काही मिनिटांत नष्ट करतात आणि शेतकरी हतबलपणे ते पाहत राहतो, हा फक्त आर्थिक नाही, तर मानसिक संहार आहे.

बिबट्यांना रोखण्यास ‘थर्मल ड्रोन’ सह ५०० ट्रॅप कॅमेरे, संगमनेरमध्ये हायटेक यंत्रणेचा वापर

नुकसान भरपाईच्या नावाने मिळणारी रक्कम शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. पंचनामे होतात, फाईल फिरते; मात्र हातात येते ती तुटपुंजी मदत. दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी तर अक्षरशः कड्यावर उभा आहे. गुठा दर केवळ १,२९० रुपये—या दरात बियाणे, मजुरी, खते, औषधे, वीज, पाणी कसे भागवायचे? त्यामुळे ऊसाचा दर किमान अडीच हजार रुपये करा, अशी शेतकऱ्यांची आर्त मागणी आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरल्याचा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.

 शेतकऱ्याच्या या आक्रोशाची किंमत कोण मोजणार?
योजना जाहीर केल्या जातात, बैठका होतात; पण शेतात उतरणारा शेतकरी मात्र एकटाच आहे. वन्य प्राणी आता जंगलात नाहीत, ते थेट शेतकऱ्याच्या दारात उभे आहेत, ही कटू वस्तुस्थिती प्रशासन नाकारू शकत नाही. आज पन्हाळ्यातील शेतकरी राजा केवळ पीक नव्हे, तर आपले प्राण, आपले कुटुंब आणि आपले भविष्य वाचवण्यासाठी झगडतो आहे. सरकार व वनविभागाने वेळीच ठोस निर्णय घेतले नाहीत, तर उद्या शेती ओस पडेल, आणि त्यावेळी शेतकऱ्याच्या या आक्रोशाची किंमत कोण मोजणार? हा प्रश्न आता संपूर्ण पन्हाळा तालुका विचारत आहे.

‘तुम्ही आमची घरे तोडली आता आम्ही…’; रत्नागिरीतील ‘या’ तालुक्यात वाढला बिबट्यांचा वावर

वनविभागाने ऊस पिकाची प्रति गुठ्ठा भरपाई दर अडीच हजार रूपये करावा. शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे. शासनाने ठोस भुमिका घ्य़ावी.
– गणपती पाटील, माजी सरपंच पोबरे.

जंगलानजीकच अर्धा एकर शेती आहे. वन्य प्राण्याच्या त्रासामुळे शेती करणं अशक्य आहे. पिकाविणा पाडून ठेवली आहे.
– बाबू करले, पिसात्री

वन्य प्राण्यामुळे पिकांची नुकसान झाल्यास शेतकर्यांनी अर्ज करावेत. पंचनामा करून भरपाई तातडीने देण्यास वनविभाग प्रयत्नशील आहे.
– रुपाली बुचडे, परिमंडल वन अधिकारी, मानवाड

 

Web Title: Leopard and wild animals fear in farmers panhala marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • kolhapur
  • Leopard
  • Panhala
  • Wild Animals

संबंधित बातम्या

अभिमानास्पद! हिंदवी स्वराज्यातील ‘या’ किल्याचा राज्य शासनाच्या संरक्षित यादीत समावेश
1

अभिमानास्पद! हिंदवी स्वराज्यातील ‘या’ किल्याचा राज्य शासनाच्या संरक्षित यादीत समावेश

Maharashtra Politics: कोल्हापुरात महायुतीचे ठरले; भाजप तब्बल…, महाविकास आघाडीचे काय होणार?
2

Maharashtra Politics: कोल्हापुरात महायुतीचे ठरले; भाजप तब्बल…, महाविकास आघाडीचे काय होणार?

Maharashtra Politics: ‘…पर्याय नसल्याने आत्मदहन करणार’; आर्थिक परिस्थिती नसल्याने BJP ने नाकारले तिकीट
3

Maharashtra Politics: ‘…पर्याय नसल्याने आत्मदहन करणार’; आर्थिक परिस्थिती नसल्याने BJP ने नाकारले तिकीट

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?
4

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.