
crime (फोटो सौजन्य: social media)
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, तावडे हॉटेल चौक हा पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा वर्दळीचा परिसर आहे. मंगळवारी पहाटे काही जण थंडीमुळे रस्त्याच्या बाजूला थांबून शेकोटी करत होते. याच वेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं त्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना चिरडलं. कारच्या धडकेत तिघेही दूर फेकले गेले अआणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काहींनी जखमींच्या मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. शाहूपुरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून उत्तरीय तपासणीसाठी तिघांचे मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवले. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त इनोव्हा कार ताब्यात घेतली असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.
स्थानिक नागरिकांनी अपघात झालेल्या चौकात वेगमर्यादा, स्पीड ब्रेकर तसेच पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
अर्धा गुंठासाठी मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या; आधी डोकं ठेचलं, नसा कापल्या, नंतर…
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पोटच्या पोरानेच आपल्या आई वडिलांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. बांबूच्या दांडक्याने डोक्यावर वार करून, विळ्याच्या पात्याने मान आणि काचेच्या तुकड्याने हाताच्या नासा कापून निर्घृण हत्या केली. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नारायण गणपतराव भोसले (वय ८२), विजयमाला नारायण भोसले (७०) अशी मृतकाचे नाव आहे. तर आरोपीचे नाव सुनील नारायण भोसले (४८, रा. हुपरी, ता. हातकणंगले) असे आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे. ही घटना हुपरी येथे घडली आहे.
Ans: भरधाव इनोव्हाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या तिघांना धडक बसली.
Ans: ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून नातेवाइकांशी संपर्क केला जात आहे.
Ans: चालकावर काय कारवाई होणार?