Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड

लग्न ठरल्याने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या तरुणीची प्रियकराने 250 फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. नंतर तरुणी बेपत्ता झाल्याचा बनाव रचणाऱ्या प्रियकरावर पोलिसांना संशय आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 11, 2026 | 11:39 AM
कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड

Follow Us
Follow Us:
  • साडेपाच वर्षांच्या प्रेमसंबंधांना लग्न ठरल्याने तरुणीने दिला नकार
  • संतापलेल्या प्रियकराने 250 फूट खोल दरीत ढकलून केल्याचा आरोप
  • अपहरणाचा बनाव उघड; पोलिसांच्या चौकशीत प्रियकराची कथित कबुली
 

कोल्हापूर : महाराष्ट्रात केतन अग्रवाल हत्याकांडाची चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातून त्याच पद्धतीची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न ठरल्यामुळे यापुढे प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने आपल्या प्रेयसीला तब्बल अडीचशे फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केल्याचा प्रकार भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरन्नूम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, सध्या रा. गारगोटी) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. अवधूत कॉलनी, गारगोटी) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. या घटनेमुळे गारगोटीसह संपूर्ण भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

साडेपाच वर्षांचे प्रेमसंबंध; लग्न ठरल्याने तरुणीने अंतर ठेवले

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद आणि तरन्नूम हे गारगोटी येथे एकमेकांच्या घरासमोर राहत होते. त्यांची जुनी ओळख होती. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या साडेपाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. तरन्नूम इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. काही महिन्यांपूर्वी तरन्नूमचा विवाह ठरला. त्यामुळे तिने श्रीपादला भेटणे टाळण्यास सुरुवात केली. यापुढे आपले प्रेमसंबंध सुरू ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका तिने घेतली होती.

हेही वाचा: मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ

गोड बोलून कड्यावर नेले अन् दरीत ढकलले

शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास श्रीपादने गोड बोलून तरन्नूमला नाईकवाडी येथील कड्यावर फिरण्यासाठी नेले. तेथे तरन्नूमने आपले लग्न ठरल्याने आता यापुढे प्रेमसंबंध ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावरून संतापलेल्या श्रीपादने दुपारी सुमारे तीनच्या सुमारास तरन्नूमला अडीचशे फूट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने स्वतः भुदरगड पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

तरन्नूम बेपत्ता झाल्याचा बनाव श्रीपादने रचल्याचे तपासात समोर आले. पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गेलो असता तरन्नूम बेपत्ता झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांना श्रीपादच्या कथनावर संशय आला. कसून चौकशी सुरू केल्यानंतर त्याच्या जबाबातील विसंगती समोर आल्या. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर त्याने तरन्नूमला दरीत ढकलल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चार तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर

शुक्रवारी रात्री उशीर झाल्याने आणि अंधार पडल्यामुळे दरीत शोधमोहीम थांबवावी लागली. शनिवारी सकाळी आंबोली येथील बचाव पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सुमारे चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर दोरीच्या साहाय्याने अडीचशे फूट खोल दरीतून तरन्नूमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवाल याची हत्या केल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच कोल्हापुरातही प्रियकराने प्रेयसीची दरीत ढकलून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने या घटनेने राज्याचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Kolhapur bhudaragad girlfriend murder boyfriend pushes woman 250 feet deep valley sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • boyfriend killed girlfriend
  • Crime . Crime News
  • In Kolhapur
  • killing news
  • kills
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

चहाविक्रेत्या दाम्पत्याचा अंत अन् अडीच वर्षांची चिमुकली गूढरीत्या गायब; या भयानक कृत्यामागचे रहस्य काय?
1

चहाविक्रेत्या दाम्पत्याचा अंत अन् अडीच वर्षांची चिमुकली गूढरीत्या गायब; या भयानक कृत्यामागचे रहस्य काय?

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती
2

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती

मित्रांशी बोलून घरी जाताना घात; प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याने बुलढाणा हादरले!
3

मित्रांशी बोलून घरी जाताना घात; प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याने बुलढाणा हादरले!

Pune Crime News: लग्नाचे आमिष दाखवून पळवले, भाड्याच्या घरात अत्याचार! पुणे सत्र न्यायालयाचा सुन्न करणारा निकाल
4

Pune Crime News: लग्नाचे आमिष दाखवून पळवले, भाड्याच्या घरात अत्याचार! पुणे सत्र न्यायालयाचा सुन्न करणारा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.