
कोल्हापूर : निवडणूकीची रणधुमाळी सुरु असतानाच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील 13 नगरपालिकांत हद्दीत तब्बल 4 हजार 150 दुबार मतदार आढळल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या पडताळणी मोहिमेत ही माहिती समोर आली असून, या निष्काळजीपणामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्दोष ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये मागील काही वर्षांपासून मतदार यादीतील विसंगतीच्या तक्रारी वाढत होत्या. नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारी, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या सखोल पडताळणीत अनेक नावांची पुनरावृत्ती, पत्ता तफावत, मृत व्यक्तींची नावे व स्थलांतरित मतदारांचे रेकॉर्ड अद्ययावत न झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अनेक मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या वार्डात किंवा दोन ठिकाणी राहण्याचे दाखले असल्याचे समोर आले आहे.
या निवडणुकीसाठी1 जुलै 2025 ची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. महिन्याभरात निवडणूक असल्याने एवढ्या कमी वेळेत दुबार मतदारांचे नाव यादीतून वगळता येणार नाही. फक्त नावापुढे दुबारचे चिन्ह असेल. निवडणूक झाली की ही नावे मतदार यादीतून वगळली जातील.
दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रभागांच्या मतदार यादीत नाव असेल तर एका प्रभागाची निवड, तर एका केंद्राची निवड करावी लागेल.एकाच प्रभागात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल तर एकाच ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करता येणार.दोन्ही पर्यायाला मतदाराकडून प्रतिसाद नसेल, तर मतदार यादीतील नावापुढे दुबारचा शिक्का. मतदार मतदानासाठी आला, तर तेथेच त्यांचे मी या केंद्रावर मतदान करत असून, अन्य केंद्रांवर मतदान करणार नाही, असे हमी पत्र लिहून घेतले जाईल, अशा तीन पातळींवर हे काम चालेल. अशी माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये चुरस जास्त असते, मतदारांची संख्या कमी असते त्यामुळे एक-एक मत महत्त्वाचे असते. पोलिंग एजंट डोळ्यात तेल घालून असतात. एक जरी दुबार मतदार आढळला किंवा एकाने अन्य ठिकाणीदेखील मतदान केले, तर लगेच त्यावर आक्षेप घेतला जातो. त्यामुळे या निवडणुकांमध्ये दुबार मतदारांची संख्या कमी असते. त्यामुळे आताकेंद्रातील पोलिंग एजंटवर राहणार मोठी जबाबदारी असणार आहे.
ही यादी त्या त्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड मतदाराने करायची आहे. त्यानुसार मतदाराकडून तसा अर्ज भरून घेतला जाईल. अन्य ठिकाणी त्यांचे नाव असेल तर त्यापुढे स्टारचे चिन्ह असेल. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना हा दुबार मतदार असल्याचे लक्षात येईल, असं सांगण्यात आलेलं आहे.
Ans: दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रभागांच्या मतदार यादीत नाव असेल तर एका प्रभागाची निवड, तर एका केंद्राची निवड करावी लागेल.एकाच प्रभागात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल तर एकाच ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करता येणार. असं प्रशासनाचं म्हणणं आहे.
Ans: स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये चुरस जास्त असते, मतदारांची संख्या कमी असते त्यामुळे एक-एक मत महत्त्वाचे असते. पोलिंग एजंट डोळ्यात तेल घालून असतात. एक जरी दुबार मतदार आढळला किंवा एकाने अन्य ठिकाणीदेखील मतदान केले, तर लगेच त्यावर आक्षेप घेतला जातो. त्यामुळे या निवडणुकांमध्ये दुबार मतदारांची संख्या कमी असते. त्यामुळे आताकेंद्रातील पोलिंग एजंटवर राहणार मोठी जबाबदारी असणार आहे.
Ans: ही यादी त्या त्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड मतदाराने करायची आहे. त्यानुसार मतदाराकडून तसा अर्ज भरून घेतला जाईल. अन्य ठिकाणी त्यांचे नाव असेल तर त्यापुढे स्टारचे चिन्ह असेल. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना हा दुबार मतदार असल्याचे लक्षात येईल.