Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : बिबट्याचा गावात हौदोस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

राज्यातील अनेक ठिकाणी बिबट्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. माजगावच्या भरवस्तीत एका गावकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 04, 2025 | 06:44 PM
Kolhapur News : बिबट्याचा गावात हौदोस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Follow Us
Close
Follow Us:
  • बिबट्याचा गावात हौदोस
  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • कोंबड्यांच्या खुराड्यात आढळला बिबट्या
राज्यातील अनेक ठिकाणी बिबट्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. कोल्हापुरच्या  माजगावच्या भरवस्तीत प्रशांत राजाराम पाटील यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. सुदैवाने पाटील बचावले. घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत पाटील यांच्या घराशेजारील कोंबड्यांच्या शेडमध्ये अचानक कोंबड्या जोरजोराने आरडाओरड करू लागल्याने ते शेडकडे गेले. शेड उघडताच त्यांना समोरच दबा धरून बसलेला बिबट्या दिसला.

त्यांनी तातडीने ग्रामस्थांना फोन करून मदतीसाठी बोलावले. काही क्षणातच गावकरी धावत पोहोचले आणि बिबट्या कंपाऊंडमध्येच अडकला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी त्याला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती क्षणातच बदलली. बिबट्याने दातांनी तार ओढत कंपाऊंड फोडण्याचा प्रयत्न केला आणि उडी मारत प्रशांत पाटील यांच्यावर झडप घेतली. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तर काही ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले. बिबट्या कंपाऊंडची तार तोडत अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक क्षेत्रपाल राजेश नवले यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी दाखल झाले.

Satara News : चांदोली राष्ट्रीय उद्यानात व्याघ्र संवर्धनाचा नवा टप्पा; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे तारा वाघिणीचा मुक्त संचार

वनपाल निशिकांत ठोंबरे, वनरक्षक सुनील यादव, मेघराज नवले, रमेश कदम व वनसहायक जयश्री जाधव यांनी पाहणी केली. मात्र पथक पोहोचेपर्यंत बिबट्या अंधारात अदृश्य झाला.गस्त वाढवून स्थिती नियंत्रणात आणणार प्रशांत पाटील यांच्या गोठ्यात या बिबट्याने यापूर्वीही सहा वेळा घुसून सात शेळ्या व काही कोंबड्या उचलल्याची नोंद वन विभागाकडे आहे. वनक्षेत्रपाल राजेश नवले यांनी परिसरात निमल आऊट औषधाची फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. रात्रीची गस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवणार अलसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हात देखील बिबट्याचं पिल्लू आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. साताऱ्यात देखील काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या. वनविभागाने बिबट्याच्या संभाव्य धोक्याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये वारंवार जनजागृती केली, तसेच रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रात्रगस्त देखील सुरू केली होती. वनविभागाच्या प्रयत्नांना मोठे यशया प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे! वनविभागाने भोसे परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात काल रात्रीच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं.

Satara News : बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या प्रयत्नांना यश; सुरक्षेसाठी उपाययोजना जारी

Web Title: Kolhapur news leopard lurks in village atmosphere of fear among citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
1

Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

Kolhapur News : कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला; जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर
2

Kolhapur News : कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला; जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर

Kolhapur News: शक्तीपीठ महामार्ग झाल्यास चंदगडला पर्यटनाचा दर्जा देणार; मुख्यमंत्री फडणवीस 
3

Kolhapur News: शक्तीपीठ महामार्ग झाल्यास चंदगडला पर्यटनाचा दर्जा देणार; मुख्यमंत्री फडणवीस 

Kolhapur News : इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी; मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट
4

Kolhapur News : इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी; मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.