
महाविकास आघाडीमध्ये ठिकठिकाणीमहाविकास आघाडीमध्ये ठिकठिकाणी दुफळी निर्माण झाल्याने अनेक शहरांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (उद्दव) गटांमध्ये जागावाटपावरून मतभेद तीव्र झाले असून काही ठिकाणी तर अधिकृत आघाडी उमेदवारांपेक्षा बंडखोरांची ताकद जास्त भासू लागली आहे. परिणामी, महाविकास आघाडीच्या ‘संयुक्त लढाई’च्या घोषणा कागदोपत्री राहून प्रत्यक्ष मैदानात प्रत्येक पक्ष स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र तयारी करताना दिसत आहे.
दरम्यान, सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरीचा सुर अधिक तीव्र झाला आहे.शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस या चारही पक्षांत अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेते स्वतःची ताकद दाखवण्यासाठी स्वतंत्र पथक उभे करत आहेत. निवडणूकप्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात ‘स्वतंत्र सुभा’ देणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत असून त्यामुळे अनेक ठिकाणी चुरस अधिक रंगतदार झाली आहे.सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू असून जनतेच्या मनात यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. आदर्श, भूमिका आणि विचार किती? आणि सत्ता मिळवण्यासाठी केलेली युत्ती किती?कारण गेल्या काही महिन्यांपूर्वीच टीका-टिप्पणी करणारे नेते आज मात्र एकोप्याच्या नावाखाली ‘भाऊगर्दी’ करताना दिसत आहेत.
विशेषत: ग्रामीण भागातील नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक गट-तट, निष्ठावंताची लढाई आणि वैयक्तिक वर्चस्वाचा संघर्ष अधिक पाहायला मिळत आहे. काही प्रभागांमध्ये कालपर्यंत एकमेकांविरुद्ध आरोप करणारे नेते आज हातात हात घालून एकजुटीचा दावा करत आहेत. तर काही ठिकाणी राजकीय मित्रांपेक्षा प्रतिस्पध्र्थ्यांसोबत करार करून ‘गोपनीय आघाड्या’ उभ्या केल्या जात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सत्ता मिळवण्यासाठी कितीही अंतर्गत वाद असले तरी प्रत्येक पक्षाला शेवटी एकमेकांशिवाय चालत नाही. तुझे माझे पटत नाही, पण तुझ्याशिवाय जमणारही नाही, अशीच स्थिती या निवडणुकीत दिसत आहे. प्रचाराची उर्मी वाढत असताना गटबाजी, तडजोडी, बंडखोरी आणि अचानक बदललेली भूमिका या सर्व घडामोडींमुळे कोल्हापूरची स्थानिक निवडणूक आता पूर्वर्वीपेक्षा अधिक रंगतदार झाली असून पुढील काही दिवसात आणखी नाट्यमय राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.
कागल नगरपालिकेसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रीफ व समजीतसिंह घाटगे या निवडणुकीत एकत्र आले आहेत. तर गडहिंग्लजमध्ये जनता दलाने मुश्रीफांच्या विरोधात भाजप, जनसुराज्य शक्ती शिवसेना शिंदे एकत्र आले आहेत. कुरुंदवाड नगरपालिकेत नव्या आघाडीचा उदय झाला आहे. पेठ वडगाव मध्ये पारंपारिक यादव आघाडी विरुद्ध युवक क्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती व ताराराणीनी मोट बांदली आहे. पन्हाळ्यामध्ये जनसुराज्यला रोखण्यासाठी भाजपची आघाडी सुरू आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांचे विरोधात आहेत. शिरोळमध्ये राजषी शाहू विकास आघाडी, शिवशाही विकास आघाडी. ताराराणी आघाडी अशी समीकरणे झाले आहेत.
Ans: काँग्रेस – राष्ट्रवादी (शरद पवार) – शिवसेना (उद्धव) गटांमध्ये जागावाटपावरून गंभीर मतभेद झाले आहेत. अनेक शहरांत दुफळी बंडखोरांची ताकद अधिक संयुक्त लढाईचे घोषणेवरच राहिलेले प्रत्येक पक्ष स्वतःची स्वतंत्र तयारी करत आहे
Ans: निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच सर्वच पक्षांत हालचाली वाढल्या आहेत. जुनी कटुता विसरून नवी मैत्री, नवी जुळवाजुळव आणि अनपेक्षित आघाड्या तयार होताना दिसत आहेत. अनेक नेते ‘भाऊ-भाऊ’ असा संदेश देत एकत्र मंचावर येत आहेत.
Ans: राजकीय समीकरणे आणखी बदलू शकतात. नवे तडजोडीचे प्रयत्न, काही ठिकाणी महत्त्वाचे नेते बाजू बदलण्याची शक्यता आणि बंडखोरांचा दबदबा वाढण्याचे संकेत आहेत.
Ans: