शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश (File Photo)
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचा मजबूत प्रभाव वाढताना स्पष्ट दिसत असून, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांत अनेक गावांमध्ये पक्षांतराची जोरदार लाट उसळली असून, कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये आगमन सुरूच आहे.
काशिळ गावचे माजी सरपंच व बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक प्रकाश जाधव यांनी काशीळ, गांधीनगर, रामकृष्णनगर, शिवाजीनगर येथील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या मोठ्या शक्तिप्रदर्शनामुळे कराड उत्तरच्या राजकारणात नवे समीकरणबदल निर्माण झाले आहे. आमदार मनोज घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने केलेल्या विकासकामांमुळे व दांडग्या जनसंपर्काच्या बळावर छोट्या-छोट्या गावांत भाजपची पकड अधिक मजबूत होत चालली आहे. एकेकाळी बाळासाहेब पाटील यांची जमेची बाजू असलेली ही गावे आता हळूहळू भाजपच्या घडीत येताना दिसत आहेत.
हेदेखील वाचा : Mhaswad Municipality Elections : नगराध्यक्षपदासाठी आता पाच महिला रिंगणात; निवडणुकीत येणार रंगत
प्रकाश जाधव यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये संजय जाधव, चेअरमन शंकर माने, माजी चेअरमन अमोल कांबळे, संचालिका मंदाकिनी माने, ग्रामपंचायत सदस्य वर्षा मोरे, नंदा जाधव, संचालक राहुल जाधव, युवा नेते दत्तात्रेय जाधव, रोहन जाधव, नारायण मोरे, भिकू मोरे, आनंदा मोरे, संजय तोडकर, बाळू तोडकर यांचा समावेश आहे.
धनकवडी येथून संदीप देशमाने, ग्रामपंचायत सदस्य शैलजा देशमाने, सुशांत देशमाने, लोहार तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव साळुंखे, अजित निकम, संतोष साळुंखे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. तर मरळी येथून बापूसो पडवळ, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर कुंभार, सोसायटी चेअरमन पांडुरंग सावंत, माजी सरपंच चंद्रकांत सावंत, सदस्य बबन सावंत, संचालक राजेंद्र नांगरे, माजी चेअरमन यांनी प्रवेश केला.
यावेळी सूर्यकांत पडवळ, माजी तालुकाध्यक्ष संतोष पाटील, महेश चंदुगडे, मनोहर साळुंखे, महेश लोहार, चरेगाव येथील सदस्य अक्षय माने उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमास भाजप जिल्हा कोअर कमिटी सदस्य गणेश जाधव यांनी विशेष उपस्थिती लावली.






