Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : स्थानिक आघाडी नाही, प्रसंगी तुतारीच्या चिन्हावर लढू ; मोहोळ गावात निवडणुकीची रणधुमाळी

नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका माविकास आघाड़ी म्हणून आम्ही जिल्ह्यात कुठेही स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणूक लढविणार नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 07, 2025 | 06:45 PM
Kolhapur News : स्थानिक आघाडी नाही, प्रसंगी तुतारीच्या चिन्हावर लढू ; मोहोळ गावात निवडणुकीची रणधुमाळी
Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक आघाडी नाही, प्रसंगी तुतारीच्या चिन्हावर लढू
  • मोहोळ गावात निवडणुकीची रणधुमाळी
मोहोळ : पक्षश्रेष्ठींनी मला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात काम करण्याच्या सूक्स दिल्या आहेत. म्हणून मी इथे आली आहे. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका माविकास आघाड़ी म्हणून आम्ही जिल्ह्यात कुठेही स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणूक लढविणार नाही. स्थानिक आघाडी करून लोक निवडून येतात आणि पुन्हा इकडे तिकडे उड्या मारतात. प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गट स्वतंत्र लढेल. आमचा एकही पदाधिकारी निवडणून नाही आला तरी चालेल परंतु सर्व जागा तुतारी या चिन्हावर लढविल्या जातील, असं परखड मत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.

Satara News : वनक्षेत्रात सांडपाण्यासाठी खोदकाम करणारा जेसीबी जप्त; महाबळेश्वरमध्ये पाईपलाईन टाकतानाचा प्रकार उघडकीस

मोहोळ येथील अजिंक्यतारा हॉटेल येथे होऊ घातलेल्या नगरपालिका जिल्ला परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विनयकुमार पाटील व मोहोळ विधानसभा अध्यक्ष रणजित चवरे यांनी संवाद बैठकीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, मोहोळचे नेते संजय क्षीरसागर, रणजित चवरे, अ‍ॅड पवन गायकवाड, बालास्तव पाटील, मनसेचे तालुका अध्यक्ष कैलास खडके, अशोक देशमुख सुवर्णा शिवपुरे, अस्ण तोडकर, विनंती कुलकर्णी, चंद्रकांत इंगळे, बंदनवाज कोरबू, विलास पाटील,  सतीश पाटील, बाळासाहेब बायोमोडे, अ‍ॅड. विठोबा पुजारी, भास्कर खटके आदी उपस्थित होते.

खासदार मोहिते-पाटील म्हणाले, मी खासदार झाल्यापासून माझ्या माढा मतदारसंघात काम करीत होतो. मी कधी ही कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ केली नाही. तरीही जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी मी सोडावीत होतो. आमचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशाने आम्ही या निवडणुकीत नवयुवकांना संधी देणार आहोत. एक पुरोगामी विचारांची चळवळ सुरू ठेवणार आहोत, असे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले.

Kolhapur welcome arch demolished : कोल्हापूरकर झाले भावूक! तावडे हॉटेल चौकातील दोन दशकांची स्वागत कमान जमीनदोस्त

नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे

माजी आमदार रमेश कदम म्हणाले, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत कार्यकर्ता हा नेत्याच्या पाठीमागे उभा असतो. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. या निवडणुकीतूनच कार्यकर्ता नेता होत असतो. अशावेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आमदारकी मलाच, खासदारकी मलाच, नगरसेवक ही मीच असे चालणार नाही. कार्यकत्यांनी काय केवळ सतरंज्या उचलायच्या का ? असा संदेश जनमानसात व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये जाईल.

आता नेत्यांच्या घरात उमेदवारी नको – रमेश कदम

मोहोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या ठिकाणी खऱ्या मागासवर्गीय महिलेलाच संधी मिळाली पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मुलीला, पत्नीला, बहिणीला अथवा नेत्याच्या घरात ही उमेदवारी दिली जाऊ नये, अशी भूमिका माजी आमदार कदम यांनी मांडली.

आमदारांवर माजी आमदारांनी डागली तोफ

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली, त्यांच्या अनुपस्थितीमुळे उपस्थित नेत्यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. मोहोळ विधानसभा मतदारसंघात अस्तित्व नसणाऱ्या व कुठलीही पात्रता नसणारा माणून केवळ शरद पवार यांच्या नावावर, त्यांच्या विचारांवर निवडून आला. मात्र आज ते काय करतोय, हे सर्वश्रुत आहे, असा हल्लाबोल माजी आमदार रमेश कदम यांनी केला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: धैर्यशील मोहिते-पाटील काय म्हणाले ?

    Ans: स्थानिक आघाडी करून लोक निवडून येतात आणि पुन्हा इकडे तिकडे उड्या मारतात. प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गट स्वतंत्र लढेल. आमचा एकही पदाधिकारी निवडणून नाही आला तरी चालेल परंतु सर्व जागा तुतारी या चिन्हावर लढविल्या जातील, असं परखड मत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.

  • Que: निवडणुकीबाबत काय म्हणाले रमेश कदम ?

    Ans: मोहोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या ठिकाणी खऱ्या मागासवर्गीय महिलेलाच संधी मिळाली पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मुलीला, पत्नीला, बहिणीला अथवा नेत्याच्या घरात ही उमेदवारी दिली जाऊ नये, अशी भूमिका माजी आमदार कदम यांनी मांडली.

Web Title: Kolhapur news no local front will fight on the symbol of the trumpet on occasion election campaign in mohol village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • Dhairyasheel Patil
  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!
1

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने
2

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक
3

Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक

Sindhudurg News : “विरोधी वातावरण शांत करण्यासाठी भाजप नेत्यांच्या सभा” – वैभव नाईक
4

Sindhudurg News : “विरोधी वातावरण शांत करण्यासाठी भाजप नेत्यांच्या सभा” – वैभव नाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.