Kolhapur Two Decades Old Welcome Arch Demolished At Tawde Hotel Chowk Kolhapur News
Kolhapur welcome arch demolished : कोल्हापूरकर झाले भावूक! तावडे हॉटेल चौकातील दोन दशकांची स्वागत कमान जमीनदोस्त
Kolhapur welcome arch: तावडे हॉटेल चौकातील ही स्वागत कमान कोल्हापूर आल्याची सूचना देत होती. मात्र गेली दोन दशकांहून अधिक काळ असणारी स्वागत कमान जमीनदोस्त करण्यात आली.
कोल्हापूरमधील दोन दशकांची तावडे हॉटेल चौकातील स्वागत कमान जमीनदोस्त करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
Kolhapur welcome arch demolished: कोल्हापूर : गेली अठ्ठावीस वर्ष कोल्हापूरकरांसह पर्यटकांची स्वागत करणारी कमान तोडण्यात आली आहे. तावडे हॉटेल चौकातील ही स्वागत कमान कोल्हापूर आल्याची सूचना देत होती. मात्र गेली दोन दशकांहून अधिक काळ असणारी स्वागत कमान जमीनदोस्त करण्यात आली. गुरुवारी (दि.06) रात्री महानगरपालिकेच्या वतीने पाडण्यात आली.
मागील २८ वर्षांपासून असलेला हा साक्षीदार जमीनदोस्त झाला आहे. या ठिकाणी परत एकदा आकर्षक कमान उभारण्यात येणार आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल चौकात महापालिकेच्या वतीने शहरात येणाऱ्या नागरिकांचे तसे पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी भव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली होती. गेली २८ वर्ष ऊन, वारा, पावसात या कमानीने येणाऱ्या लोकांचे स्वागत केले होते. मात्र गेल्या काही वर्षात या कमानीची दुरुस्ती झाली नव्हती. कमानीचा काही भाग ढासळत चालला होता. त्यामुळे अपघात घडू नये यासाठी ही कमान उतरवण्याचा निर्णय घेतला होता.
गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून कमान उतरण्याचे काम सुरू केले. दोन पोकलेन, सहा डंपर, ब्रेकर आदी साहित्य घेऊन महापालिकेचे कर्मचारी कमानी जवळ दाखल झाले. त्यानंतर साडेदहा वाजता कमानीवरील स्वागत फलक काढण्यात आला आणि पावणे अकरा वाजता कमान पाडण्यास सुरुवात करण्यात आली.
सुमारे दोन तासात कमान पूर्णता पाडण्यात आली. कमान खाली कोसळल्यानंतर डंपरच्या साह्याने कमानीचे साहित्य इतरत्र हलवण्यात आले. यादरम्यान शहरातून बाहेर जाणारे आणि शहरात येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. सदरची कमान पाडत असताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दरम्यान अडथळा निर्माण होत झाल्याने पोलिसांनी त्यांना बाजूला हटवले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील, जल अभियंता हर्षदीत घाटगे, शहर अभियंता रमेश मस्कर ,मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, अग्निशामक अधिकारी मनीष रणभिषे, उप शहर अभियंता निवास पवार आदी उपस्थित होते.
Web Title: Kolhapur two decades old welcome arch demolished at tawde hotel chowk kolhapur news