
कोल्हापूर: राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाने चांगलंच थैमना घातलं आहे. आधी गेल्या वर्षभरात अवकाळी आणि आता परतीच्या पासाने बळीराजाची दाणादाण उडाली आहे. गगनबावडा तालुक्यात सध्या भात कापणी हंगाम जोरात सुरू झाला आहे. शेतकरी भात काढणीच्या कामात गुंतले आहेत. शिवारात कामाची झुंबड उडाली आहे. अवकाळी पावसाची सततची भीती आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी पीक पदरात पाडून घेण्यासाठी अक्षरशः दिवस-रात्र काम करत आहे. सध्या ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी वर्गाची तारांबळ उडत आहे.
पावसाची भीती तरी कापणी करायला सुरुवात केली अशी स्थिती निर्माण झाली आहे. गगनबावडा तालुक्यात प्रामुख्याने शेतीला प्राधान्य जास्त दिलं जातं.
या तालुक्यात ऊस पिकापाठोपाठ भाताचं पीक देखील जास्त प्रमाणात घेतले जाते. पण सध्या परतीच्या पावसाने शेतकऱ्याला हैराण करून सोडले आहे. हा पाऊस ठीक ठिकाणी लागत असून विशेषत यीक विकास प्रति विशेषत सध्या भात कापणीची कामे सुरू झाली आहे.
हवामान बदलामुळे अवकाळीचे सावटतालुक्याच्या काही भागांमध्ये भुईमूग नाचना ही प्रमुख पिके घेतली जातात. सध्या या पिकांच्या काढणीची कामे सुरू आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी मिळेल त्या वेळेत मळणी व साठवणूक करण्यात भर देत आहे. हवामानातील अनिश्चित बदलामुळे अवकाळी पावसाचे सावट नेहमीच डोक्यावर आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता लवकरात लवकर पीक काढण्याचा प्रयत्न करत आहे. ऊस वाहतुकीला खड्यांचा अडथळाऊस तोडणी ही सुरुवात झाली आहे अनेक कारखान्याने बॉयलर पेटवून मोळीपूजनही केली आहे.
परंतु पाऊस असल्यामुळे ऊस वाहतूक करणे, ट्रॅक्टर फडातून बाहेर काढणे अवघड झाले आहे व ट्रॉल्यामध्ये ऊस भरणे ही ऊस तोडणी कामगारांना धोकादायक आहे. तसेच अनेक आंदोलने करून व निवेदन देऊन सुद्धा कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरती पडलेले खड्डे बुजवण्यासाठी एक महिना झाला तरी अजून खड्डे बुजवून पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे ऊस वाहतुक करणे म्हणजे जीवाशी खेळ करत येणे असे होत आहे. तरीही त्यातून ऊस वाहतूक केली जाते पण ही ऊस वाहतूक करत असताना ट्रॉली पलटी झाली व अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.