
महायुतीत सावळा गोंधळ आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी आम्हीच चिन्हावर उभा आहोत. महायुतीमध्ये सावळा गोंधळ आहे, हे समोर आले आहे. कोण म्हणतं तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत. मालक आम्ही आहे. पण हे सरकार विसरलं की तिजोरीचे मालक महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे सावळा गोंधळ सुरू आहे, हे बाहेर आलं आहे. महाराष्ट्रातील जनता निराश आहे, राज्य चुकीच्या दिशेला चालले आहे. महायुतीत अस्वस्थता आहे, है आम्ही सांगण्याची गरज नाही तुमच्या लोकांवर तुमचे कंट्रोल नाही हे समोर आलं आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.
स्थानिक नेतृत्वात ताकद नाही. त्यामुळं वरिष्ठ पातळीवरील नेते प्रचारासाठी येत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रचार सभा घेत आहेत. अनेक ठिकाणी – महायुती विरुद्ध महायुती आहे. लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. लोकांनी याबाबत महायुतीला जाब विचारला पाहिजे. काँग्रेस नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत – जोरदारपणे निवडणुका लढवत आहोत. काँग्रेसचं चिन्ह नाही, असं म्हणणं म्हणजे विरोधकांचा अभ्यास कमी – असल्याचं द्योतक आहे.
आमदार पाटील म्हणाले, एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे, असं म्हणत असेल तर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे, मतदार यादीतील घोळ किती मोठ्या प्रमाणात आहे. है वारंवार समोर येत असून ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगात सांगतो. त्या ठिकाणी आम्ही मतदार यादी नीट करू शकत नाही. यासारखी शोकांतिका नाही. राजकीय पक्षांनी हे काम करायचं म्हटलं तर निवडणूक आयोग कशाचे पैसे घेते. थोडा वेळ लागला. निवडणुका पुढं गेल्या तरी चालेल, पण हे दुरुस्त करून घ्यावे. सत्ताधारी पक्ष देखील याबाबत बोलत असतील, तर याची दखल घेतली पाहिजे, मतदार याद्या बनवण्याचे काम कोणत्या कंपनीला दिलं होते, त्या कंपनीच नाव सरकारनं जाहीर करावं, असे आ. पाटील यांनी महायुती सरकारला आव्हान दिले आहे.
Ans: पाटील यांनी व्यंगात्मक भाषेत म्हटलं की “बावनकुळेंनी तर हेलिकॉप्टरमधून सातबारा उतारे फेकण्याचे बाकी ठेवले आहेत”, म्हणजे जनतेला आकर्षित करण्यासाठी अतिशयोक्त आश्वासने दिली जात आहेत.
Ans: त्यांच्या मते स्थानिक नेत्यांची ताकद कमी असल्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांना प्रचारासाठी यावं लागत आहे.
Ans: अनेक ठिकाणी महायुतीमधीलच गट एकमेकांविरुद्ध उभे राहत असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचं ते म्हणाले.