कराड : नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर निवडणुकीत महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाकडून पाठिंब्यासंदर्भात अद्याप चर्चा न झाल्याने, दलित महासंघाने स्थानिक पातळीवर स्वबळावर निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे. कराड येथे झालेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. बैठकीला दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, सांगली जिल्हा प्रभारी बळीराम रणदिवे, सातारा जिल्हाध्यक्ष उमेश खंड्झोडे, तसेच पदाधिकारी राम दाभाडे, रमेश सातपुते, राहुल वायदंडे, तुकाराम वालेकर, अनिल थोरात, धनाजी सकटे, महावीर सर्वगौड, दिनकर वायदंडे, अरुणा कांबळे, संपतराव कांबळे, राजेंद्र जावीर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन इच्छुक कार्यकर्त्यांकडून मतदार गट व गणाची माहिती प्रस्तावित केल्यास, महासंघ महायुतीसमोर जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले, नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याची तयारी याच बैठकीत अनुसूचित जाती आरक्षणातील वर्गीकरण (एबीसीडी) प्रश्नासंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याच्या तयारीचा आढावा घेऊन प्राथमिक नियोजन करण्यात आले. बैठकीचे स्वागत रमेश सातपुते, प्रास्ताविक राम दाभाडे यांनी, तर अनिल थोरात यांनी आभार मानले.
सातारा (प्र.) कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी खबरदारीचा उपाय म्हणुन प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीच्या 300 मीटर परिसरात 26 नोव्हेंबर ते 24 जानेवारी 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत भारतीय नागरिक संहिता2023 चे कलम 163नुसार प्रतिबंध करण्याचा सातारा पोलीस अधीक्षक आदेश तुषार दोशी यांनी जारी केला आहे. हा आदेश 26 नोव्हेंबर पासून 24 जानेवारी2026 पर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
Ans: दलित महासंघाने महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाकडून अद्याप चर्चा न झाल्याने स्थानिक पातळीवर स्वबळावर निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे.
Ans: इच्छुक कार्यकर्त्यांनी मतदार गट व गणाची माहिती दिल्यास महासंघ महायुतीसोबत जागावाटपाची चर्चा करेल असे सांगण्यात आले.
Ans: अनुसूचित जाती आरक्षणातील एबीसीडी वर्गीकरण या प्रश्नावर नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याची तयारी करण्यात आली.






