Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम

पाश्चिम आशियातील इराण आणि इस्त्राईल यांच्यात पेटलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून, याचे गंभीर परिणाम कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर, विशेषतः फाऊंड्री उद्योगावर होताना दिसत आहे

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2026 | 02:09 PM
Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम
Follow Us
Follow Us:
  • ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका;
  • कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम
कोल्हापूर : पाश्चिम आशियातील इराण आणि इस्त्राईल यांच्यात पेटलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून, याचे गंभीर परिणाम कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर, विशेषतः फाऊंड्री उद्योगावर होताना दिसत आहेत. इंधन दरवाढ आणि लॉजिस्टिकमधील अडथळ्यांमुळे कोल्हापूरच्या उत्पादनांचा खर्च वाढणार असून, याचा फटका सामान्य ग्राहकांना वाहनांच्या वाढीव किमतीच्या रूपाने बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः ४०० ते ५०० फाऊंड्री कार्यरत आहेत. या उद्योगांसाठी लागणारा मुख्य कच्चा माल, जसे की पिग आयर्न आणि कोळसा, प्रामुख्याने भारतीय बाजारपेठेतून उपलब्ध होतो. मात्र, काही विशेष दर्जाच्या उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल परदेशातून आयात करावा लागतो. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विस्कळीत झाली असून, आयात होणाऱ्या मालाचे दर गगनाला भिडले आहेत. भारतीय कच्च्या मालाच्या किमतीही इंधन दरवाढीमुळे वाढण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूरमधील दिग्गज उद्योग समूह असलेल्या घाडगे पाटील इंडस्ट्रीज वर या युद्धाचा मोठा प्रभाव पहाणार आहे. याविषयी माहिती देताना कंपनीचे प्रमुख किरण पाटील यांनी सांगितले की, जगभरातील ‘ऑइल अँड गैस व्हॉल्व्ह पुरवठा करणाऱ्या अवघ्या चार मोठ्या कंपन्यांपैकी ‘जीपीआय’ ही एक महत्वाची कंपनी आहे.’उत्पादने जगभरातील तेल आणि वायू वितरणाचे ‘कंट्रोलर’ म्हणून काम करतात. या प्रॉडक्ट्सना आधीच आंतरराष्ट्रीय टैरिफचा (शुल्क) सामना करावा लागत होता, त्यात आता युद्धाची भर पडली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून उत्पादनावर परिणाम होत आहे,’ असे किरण पाटील यांनी स्पष्ट केले.

Kolhapur News : वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

भविष्यातील चित्र काय ?

जर हे युद्ध दीर्घकाळ चालले, तर कोल्हापूरच्या फाऊंड्री उद्योगाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये होणारी ही दरवाढ साखळी पद्धतीने शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचते. त्यामुळे येणाऱ्या काळात ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर प्रवासी वाहने महाग होण्याची दाट शक्यता आहे.

इंधन दरवाढः उद्योगांचे कंबरडे मोडणार असल्याचे चित्र

युद्धाचा सगळ्यात मोठा आणि तात्काळ परिणाम म्हणजे इंधन दरवाढ. किरण पाटील यांच्या मते, डिझेल आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च प्रचंड वाढणार आहे. कोल्हापुरात तयार होणारा माल देश-विदेशात पाठवण्यासाठी रस्ते आणि समुद्री मार्गाचा वापर होतो. इंधन महागल्याने उत्पादनाचा एकूण खर्च वाढेल, ज्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाहनांच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. समुद्रातील तणावामुळे जहाजांचा प्रवास लांबणीवर पडला असून भाडे वाढले आहे. युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठा युद्धामुळे प्रभावित झाल्या तर कोल्हापूरच्या एक्सपोर्ट ऑर्डरला फटका बसू शकतो. स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होऊन कच्चा माल महागल्याने छोट्या फाऊंड्री मालकांचे नफ्याचे प्रमाण घटणार आहे.

Sangali News : वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव; गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 

Web Title: Iran israel war kolhapuri business hit by war serious consequences of recession due to raw material prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.