Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : जिल्ह्याच्या अर्थकारणाला पशुधनातून मिळतेय गती; प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना बियाणे वाटप

ग्रामीण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारा दुग्धव्यवसाय हा एकमेव शाश्वत पर्याय असून, जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती देत आहे,

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 08, 2025 | 12:34 PM
Kolhapur News : जिल्ह्याच्या अर्थकारणाला पशुधनातून मिळतेय गती; प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना बियाणे वाटप
Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्ह्याच्या अर्थकारणाला पशुधनातून मिळतेय गती
  • प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना बियाणे वाटप
  • स्थानिक व्यवसायातून आर्थिक चालना
कोल्हापूर : ग्रामीण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारा दुग्धव्यवसाय हा एकमेव शाश्वत पर्याय असून, जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती देत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. शासकीय विश्रामगृहात पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित ‘पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन’ कार्यशाळा आणि वैरण बियाणे वाटप कार्यक्रमाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात केंद्र शासनाचा मानाचा ‘राष्ट्रीय गोपाळरत्न’ पुरस्कार (प्रथम क्रमांक) मिळवल्याबद्दल चिखली (ता. कागल) येथील अरविंद यशवंत पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. अमल महाडिक, आ. अशोकराव माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., डॉ. महेश शेजळ, डॉ. प्रमोद बाबर आदी उपस्थित होते.

Kolhapur News : 1200 गावांत पहिल्यांदा झाले ‘Deemed ANA’; जिल्ह्यातील 3 लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा

प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना बियाणे वाटप

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, दुग्धव्यवसायिकांना गतीने प्रगती करण्यासाठी अशा तांत्रिक कार्यशाळामधून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रमातून जिल्ह्यात १०० टक्के अनुदानावर २० हजार पशुपालकांना मका, ज्वारी आणि बरसिम यासारख्या वैरणीचे बियाणे मोफत दिले जात आहे. या योजनेसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेत कागदपत्रांची पूर्तता करून हे बियाणे उपलब्ध होईल. या बियाणे वाटपामुळे पशुना सकस चारा आणि मुरघासासाठी मदत होणार आहे. भविष्यातील दुग्धव्यवसाय वाढीसाठी कष्टाळू शेतक-यांची जिल्ह्याला गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात शेतक-यऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बियाणे वाटप करून योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

तांत्रिक मार्गदर्शन सत्रात विविध तज्ज्ञांचा सहभाग

तांत्रिक मार्गदर्शन सत्रात विविध तज्ज्ञानी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दयावर्धन कामत यांनी जनावरांच्या आजारपणात ‘इथनो व्हेटर्नरी’ औषधांचा वापर, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण भट यांनी चारा पिकांचे लागवड तंत्र व पोषणमूल्य, सहायक आयुक्त डॉ. सैम लुद्रीक यांनी पशुआरोग्यात सकस चाऱ्याचे महत्त्व, टीएमआर तंत्र व वंध्यत्व निवारण विषयी तर डॉ. वैभव खराडे यांनी आधुनिक चारा लागवडीबाबत सविस्तर माहिती दिली. याबाबत प्रास्ताविक सहायक आयुक्त डॉ. प्रमोद बाबर यांनी केले.

Satara News : कर्जबुडवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिल्ह्यातील पशुधनाचे महत्त्व काय आहे?

    Ans: कोल्हापूर जिल्ह्यात साधारण साडेआठ लाख पशुधन असून हे पशुधन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देते. ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न, स्थैर्य आणि रोजगार टिकवण्यासाठी दुग्धव्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आधार ठरतो.

  • Que: हा कार्यक्रम कोणत्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता?

    Ans: शासकीय विश्रामगृहात ‘पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन’ या कार्यशाळेचा व वैरण बियाणे वाटप कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

  • Que: कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कोण होते?

    Ans: पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. विविध वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ

Web Title: Livestock is boosting the economy seeds are being distributed to farmers in a representative manner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Business
  • kolhapur

संबंधित बातम्या

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार
1

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार
2

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

कोल्हापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार; माजी महापौर सई खराडे यांचा शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
3

कोल्हापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार; माजी महापौर सई खराडे यांचा शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

Satara News : कर्जबुडवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा इशारा
4

Satara News : कर्जबुडवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.