Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिनीमंत्रालयासाठी आराखडा; करवीर, कागल तालुक्यांत जिल्हा परिषदेचा नव्याने एक गट वाढला

अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चीत झाल्या असून सोमवारी जिल्हा परिषदचे ६८ गट आणि पंचायत समितीचे १३६ गणाचे प्रारूप मतदारसंघ जाहीर झाले.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 16, 2025 | 10:33 PM
मिनीमंत्रालयासाठी आराखडा; करवीर, कागल तालुक्यांत जिल्हा परिषदेचा नव्याने एक गट वाढला

मिनीमंत्रालयासाठी आराखडा; करवीर, कागल तालुक्यांत जिल्हा परिषदेचा नव्याने एक गट वाढला

Follow Us
Close
Follow Us:

अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चीत झाल्या असून सोमवारी जिल्हा परिषदचे ६८ गट आणि पंचायत समितीचे १३६ गणाचे प्रारूप मतदारसंघ जाहीर झाले. नव्या प्रारूप आराखाड्यामध्ये करवीर तालुक्यात पाडळी खुर्द आणि कागल तालुक्यात बानगे असे दोन गट वाढले आहेत. त्यामुळे १२ गट झालेल्या करवीर तालुक्याचा नेहमीप्रमाणे मिनीमंत्रालयावर वरचष्मा राहणार आहे. दरम्यान कागलसह आजरा, चंदगड, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील मतदारसंघात फेरबदल झाले आहेत.

यामधील गावांची उलथापालथ लक्षात घेता, कोणती गावे कुणाच्या फेव्हरमध्ये आहेत, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. उर्वरित चार तालुक्यांत मतदारसंघाची रचना पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघासाठी (गट) आणि पंचायत समितीच्या मतदारसंघासाठी (गण) जिल्ह्याच्या २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या विचारात घेण्यात आली आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३,८७६,००१ आहे, ज्यापैकी १२,३०,००९ शहरी आणि २६,४५,९९२ ग्रामीण भागात राहतात या माहितीवरून प्रारूप आराखाडा जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये १२ तालुके, १२ पंचायत समित्या, १ महानगरपालिका, १० नगरपालिका आणि १,०२९ ग्रामपंचायती आहेत. या सर्व माहितीच्या आधारे सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६७ वरून पुन्हा ६८ तर पंचायत समितीची सदस्य संख्या १३४ वरून १३६ इतकी झाली आहे. हे मतदारसंघ निश्चित करण्यासाठी काही दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार मतदारसंघाची प्रारूप रचना निश्चित करण्यात आली आहे. यावर आता २१ जुलै पर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. मात्र हरकती काही आल्या तरी या प्रारूप रचनेमध्ये फारसा बदल घडून येणार नाही हे जवळ जवळ निश्चित आहे. प्रारूप मतदारसंघांवर सोमवार १४ जुलैपासून हरकत दाखल करता येणार आहे. या हरकती अथवा सूचना जिल्हाधिऱ्यांकडे सादर कराव्या लागणार आहेत.

२१ जुलैपर्यंत या हरकती सादर करता येणार आहेत. हरकत दाखल करण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी वगळून सहा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. दरम्यान हरकतींची विभागीय आयुक्तांकडे याची सुनावणी होईल. त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे येईल आणि १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी हा प्रारूप रचना प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. कागल तालुक्यातील वाढलेल्या सहाव्या बानगे या जिल्हा परिषद गटात आनूर, पिंपळगाव बुद्रुक, मळगे खुर्द, माळगे बुद्रुक, भडगाव, चौंडाळ, चिमगाव, अवचित वाडी, शिंदेवाडी, कुरणी, सुरूपली, कुरुकली, सोनगे या गावांचा सावेश आहे.

आजऱ्यातील एक गट कमी, पंचायत समितीचे चार गण

भौगोलिक रचनेचा व नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींचा विचार करता कागल आणि करवीर तालुक्यात दोन्ही मतदारसंघाची संख्या प्रत्येकी एक गट आणि दोन गणाने वाढली आहे. यापूर्वी कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच तर पंचायत समितीचे दहा मतदारसंघ होते, आता जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समितीसाठी १२ मतदारसंघ तथा गट झाले आहेत. करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ११ तर
पंचायत समितीचे २२ मतदार संघ तथा गण होते, ते आता नव्या रचनेत जिल्हा परिषदेचे १२ तर पंचायत समितीचे २४ मतदारसंघ झाले आहेत. आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीचे सहा मतदारसंघ होते. नव्या रचनेत आजऱ्यातील एक मतदारसंघ कमी झाला असून तिथे जिल्हा परिषदेचे आता दोन मतदारसंघ होतील, तर पंचायत समितीचे चार मतदारसंघ असतील.

आजरा, चंदगड, हातकणंगले नगरपंचायत आली अस्तित्वात

करवीर आणि कागल तालुक्यात मतदारसंघात प्रत्येकी एकाची वाढ झाली आहे. यामुळे या तालुक्यातील मतदारसंघाच्या यापूर्वीच्या रचनेत बदल झाला असून या तालुक्यांना आत विशेष महत्व आले आहे. गट आणि गण वाढल्याने कार्यकर्त्यांना अधिकची संधी देता येणे नेतेमंडळीना शक्य झाले आहे. जिल्ह्यात २०१७ नंतर हुपरी आणि शिरोळ या दोन नगरपालिका तर आजरा, चंदगड आणि हातकणंगले या नगरपंचायती नव्याने अस्तित्वात आल्या. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातून ही शहरे वगळण्यात आली आहेत त्याचा परिणाम नवी गावे या मतदारसंघात समाविष्ठ झाली आहेत. यामध्ये कोणती गावे आपल्यातून अन्यत्र गेली आहेत याची सोमवारी दिवसभर इच्छुकांकडून विचारणा केली जात होती. तर सहा तालुक्यांतील मतदारसंघात बदल झाला आहे.

सांगरूळ गटात चिंचवडे, भामटे गावांचा नव्याने समावेश

करवीर तालुक्यात एक जिल्हा परिषद मतदार गटाची वाढ होऊन १२ गट तयार झाले आहेत. यामध्ये पाडळी खुर्द हा नवीन जिल्हा परिषद गट तयार झाला आहे. या गटात सांगरूळ जिल्हा परिषद गटातील कोगे, बीड, शिरोली दुमाला आणि परिते जिल्हा परिषद गटातील वाशी, वाडीपीर ही गावे जोडण्यात आली आहेत. पाडळी खुर्द हे गाव शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून घेतले आहे. म्हणजेच तीन जिल्हा परिषद गटातील गावे एकत्र घेऊन पाडळी खुर्द हा जिल्हा परिषद गट तयार झाला आहे. न्या गावांसह शेळकेवाडी नांदगाव, महे, आरे, सावरवाडी शिरोली दुमाला, सडोली दुमाला, हिरवडे दुमाला या गावांचा समावेश आहे. सांगरूळ जिल्हा परिषद गटात चिंचवडे आणि भामटे या दोन गावांचा नव्याने समावेश झाला आहे.

Web Title: Local body elections finalized draft constituencies of 68 zilla parishad groups and 136 panchayat samiti groups were announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 10:33 PM

Topics:  

  • Local Body Election
  • Local Body Election 2025
  • Maharashtra Election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
1

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
2

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
3

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका; म्हणाले, “सलीम जावेद यांच्याशी संपर्क…’
4

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका; म्हणाले, “सलीम जावेद यांच्याशी संपर्क…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.