Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : मनपाच्या प्रारूप मतदार यादीत सावळा गोंधळ; मतदारांचा प्रभाग बदलल्याने नागरिक संतप्त

Local Body Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या.निवडणूका ऐन उंबऱ्यावर येऊन ठेपल्या असताना मतदार यादीत सावळा गोंधळ झाल्याचं समोर आलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 22, 2025 | 01:24 PM
Mira Bhayander : मनपाच्या प्रारूप मतदार यादीत सावळा गोंधळ; मतदारांचा प्रभाग बदलल्याने नागरिक संतप्त
Follow Us
Close
Follow Us:
  • मनपाच्या प्रारूप मतदार यादीत सावळा गोंधळ
  • मतदारांचा प्रभाग बदलल्याने नागरिक संतप्त
  • नेमकं प्रकरण काय ?
 

भाईंदर/विजय काते : निवडणूका ऐन उंबऱ्यावर येऊन ठेपल्या असताना मतदार यादीत सावळा गोंधळ झाल्याचं समोर आलेलं आहे. मीरा-भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या. एका प्रभागातील 20 ते 30 टक्के मतदारांची नावं थेट दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रभागात टाकण्यात आली. याप्रकरणावर नागरिक, संघटना आणि राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. गुरुवारपासून याद्या घेण्यासाठी इच्छुकांकडून पालिकेत मोठी गर्दी झाली. याद्यांमधील झालेला बदल पाहून नागरिकांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

माळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात; महायुतीतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

महापालिकेने 24 प्रभागांच्या प्रारूप याद्या हरकती व सुचना नोंदविण्यासाठी जाहीर केल्या आहेत. वेबसाइटवरही याद्या उपलब्ध असल्या तरी, विविध प्रभागांत मतदारांची ‘अदलाबदल’ झाल्याने पहिल्याच दिवशी तीन हरकती पालिकेकडे दाखल झाल्याची माहिती मिळाली.

काँग्रेसकडून आयुक्तांना तक्रार

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी नगरसेवक राजीव मेहरा आणि जुबेर इनामदार यांनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन गंभीर तक्रारी केल्या. तब्बल30 टक्के मतदारांचे प्रभाग बदलून टाकण्यात आले असून, अनेक गृहसंकुलांची नावे चुकीच्या प्रभागांमध्ये समाविष्ट असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

“सुधारित याद्या आधी प्रकाशित करा आणि मग हरकतींसाठी मुदत वाढवा,” अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आयुक्तांनी सुधारणा केली जाईल, असे आश्वासन दिले असले तरी, काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगातही तक्रार दाखल केली आहे.

भाजपावर ‘मतांचा खेळ’ केल्याचा आरोप

Maharashtra Politics : अशी ही बनवाबनवी! कॉंग्रेस आऊट तर मनसे इन? शरद पवारांचा नवा डाव

जुबेर इनामदार यांनी “भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतांची चोरी करण्याचा पुरावा” असल्याचा आरोप केला. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनीही असा आरोप केला की, विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यानंतर आता महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. “बोगस मतदार वगळलेले नाहीत, उलट लक्ष विचलित करण्यासाठी प्रभागांत गोंधळ निर्माण केला आहे,” असे ते म्हणाले.

शिवसेना (ठाकरे गट) कडूनही तीव्र प्रतिक्रिया

महिला जिल्हा संघटक नीलम ढवण यांनी प्रभाग ३ मधील इमारती प्रभाग 4 आणि 11 मध्ये, तर इतर प्रभागातील इमारती प्रभाग 3 मध्ये टाकल्याचा आरोप केला.
प्रभाग 10, 4, 11, 8, 17, 21, 16, 9, 19, 22 अशा अनेक प्रभागांत नावांची अदलाबदल केल्याचेही त्यांनी सांगितले.

माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी विधानसभा मतदार याद्यांवर आधारित प्रभागनिहाय विभागणीचे काम महापालिकेच्या कर विभागाने केले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे. प्रारूप मतदार याद्यांतील मोठ्या प्रमाणातील गोंधळामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील सुधारित यादीत हे दोष दूर होणार का, आणि नागरिकांच्या हरकतींवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mira bhayander confusion in the draft voter list of the municipal corporation citizens are angry as the ward of voters has been changed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Maharashtra Election 2025
  • Marathi News
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Sindhudurg News: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना सहा लाखांची मदत द्यावी; न्यायालयाने नक्की काय सांगितलं?
1

Sindhudurg News: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना सहा लाखांची मदत द्यावी; न्यायालयाने नक्की काय सांगितलं?

Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला
2

Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला

Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र
3

Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र

Sambhajinagar : ज्यांची घरे पाडली त्यांना मोबदला द्यावा-हर्षवर्धन जाधव
4

Sambhajinagar : ज्यांची घरे पाडली त्यांना मोबदला द्यावा-हर्षवर्धन जाधव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.