Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : महायुतीत गोंधळ; कागलमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी

राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे, महात्मा गांधींच्या राजकीय मार्गदर्शकांचे गाव, आणि गैबी चौकातून घडणाऱ्या प्रखर राजकीय हलचाली सुरु आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 22, 2025 | 03:53 PM
Kolhapur News : महायुतीत गोंधळ; कागलमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी
Follow Us
Close
Follow Us:
  • महायुतीत सावळा गोंधळ
  • कागलमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी
  • नेत्यांचे हातात हात, कार्यकर्त्यांची उपेक्षा
कोल्हापूर/दीपक घाटगे : राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे, महात्मा गांधींच्या राजकीय मार्गदर्शकांचे गाव, आणि गैबी चौकातून घडणाऱ्या प्रखर राजकीय हलचाली सुरु आहेत. पक्षीय नव्हे तर निव्वळ गटांच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये सध्या ‘राजकीय ब्लॅक कॉमेडी’चं रंगमंच उभं राहिलं आहे. “रोटी-बेटी व्यवहारही नाही” इतकी कट्टर गटबाजी असलेल्या कागलमध्ये गेल्या पन्नास वर्षांत कधीही न पाहिलेलं दृश्य गटांचे प्रमुख हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे यांनी हातमिळवणी करून सर्वांनाच चक्रावून टाकलं आहे.

“आम्ही सत्तेसाठी नव्हे, तर कागलच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत,” असं दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, “गेल्या दहा हजार वर्षांत आणि पुढच्या दहा हजार वर्षांत लोकांना पागल करणारे असं राजकारण होणार नाही,” अशी परिस्थिती कागलमध्ये निर्माण झाली आहे. इतिहासात प्रथमच कट्टर प्रतिस्पर्धी गटांचे नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घाटगेंची समजूत काढून त्यांना लोकसभेची खात्री दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असले तरी, याला ठोस आधार नाही.

बारामती नगरपालिका निवडणुकीत येणार रंगत; माजी नगराध्यक्ष सुनिल पोटेंनी मुलाला सोडून जितेंद्र गुजर यांना दिले समर्थन

घाटगेच्या निर्णायक पावलावर निष्ठावंत कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेणारे घाटगे, यावेळी मात्र त्यांनाच वाऱ्यावर सोडत असल्याची भावना उघडपणे उमटत आहे. “विकासासाठी एकत्र आलो या स्पष्टीकरणावर गैबी चौकातील शेबडं पोरगसुद्धा विश्वास ठेवणार नाही, अशी चुटकी कार्यकर्त्यांकडून घेतली जात आहे. आगामी निवडणूक काळात हा ‘ब्लॅक कॉमेडी ‘चा खेळ कोणाच्या वाट्याला फायदेशीर ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

गटनिहाय राजकारणाचा इतिहास

अगदी सुरुवातीला राजे विक्रमसिह घाटगे विरुद्ध सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ, हसन मुश्रीफ विरुद्ध सदाशिवराव मंडलिक, संजय घाटगे विरुद्ध सदाशिवराव मंडलिक, संजय मंडलिक विरुद्ध हसन मुश्रीफ असे गटातटाचे राजकारण या तालुक्याने पाहिले आहे. इथे पक्षीय लेबल असूनही राजकारण मात्र गटनिहाय होते आणि आजही आहे.

मुश्रीफ यांनीही तितकेच विरोधाचे राजकारण केले होते. कागलच्या या जुळवाजुळवीवर महायुतीतीलच स्वराजकारण तापले आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांनी युती धर्माची तमा न बाळगता मुश्रीफावर कडक टीका केली आहे. “माणसाचा उपयोग करून, काम संपलं की फेकून देणं ही मुश्रीफांची राजकीय नीती आहे. अशा वापरा आणि फेकून द्या प्रवृत्तीच्या मागे आम्ही जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे आता मंडलिक यांच्या पाठीशी पालकमंत्री आबिटकर उभे राहिल्याने समीकरणं आणखी गुंतागुंतीची बनली आहेत. एकूणच, गटबाजीची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये सध्या राजकीय पातळीवर अशी उलथापालथ सुरू आहे की, कार्यकर्ते चक्रावले आहेत, नेतृत्व गोंधळले आहे आणि महायुतीत अंतर्गत भूकंप निर्माण झाल्याची स्थिती आहे.

Kolhapur News : महा ई सेवा नवीन केंद्राच्या परवानगीस ‘ब्रेक’; चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दिला आदेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुढे या हातमिळवणीचा राजकीय फायदा कोणाला होणार?

    Ans: हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र कार्यकर्त्यांचा रोष, महायुतीतील तणाव, आणि बदलती समीकरणे पाहता हा ‘ब्लॅक कॉमेडी’चा खेळ कोणाच्या बाजूने फिरेल, हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होईल.

  • Que: या घडामोडीमुळे महायुतीत काय परिणाम झाला?

    Ans: महायुतीतच तापलेले वातावरण आणखी पेटले आहे. खासदार संजय मंडलिक यांनी मुश्रीफांवर तीव्र टीका केली असून त्यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे.

  • Que: कागलमध्ये सध्या कोणती मोठी राजकीय घडामोड झाली आहे?

    Ans: कागलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे हे दोघे प्रथमच एका व्यासपीठावर आले असून हातमिळवणी केली आहे. हे दृश्य गेल्या पन्नास वर्षांत कधीच पाहिले नव्हते.

Web Title: Kolhapur news confusion in mahayuti clear displeasure from loyal workers in kagal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Local Body Election 2025
  • Mahayuti
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: महायुतीत बेबनाव तर माविआ काही ठिकाणी भक्कम, सर्वच निवडणुक कार्यालयांमध्ये ‘जत्रा’
1

Ahilyanagar News: महायुतीत बेबनाव तर माविआ काही ठिकाणी भक्कम, सर्वच निवडणुक कार्यालयांमध्ये ‘जत्रा’

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार
2

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत येणार रंगत; नगराध्यक्षपदाची लढत ‘तिरंगी’ होणार
3

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत येणार रंगत; नगराध्यक्षपदाची लढत ‘तिरंगी’ होणार

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
4

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.