Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: “महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास…”; निवडणुकीवर काय म्हणाले आमदार राजेश क्षीरसागर

गेल्या तीन वर्षांच्या काळात महायुती सरकारने लाडकी बहीण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, एस.टी.प्रवासात  सवलत असे जनहिताचे निर्णय घेतले, असे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 11, 2025 | 02:35 AM
Kolhapur News: "महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास..."; निवडणुकीवर काय म्हणाले आमदार राजेश क्षीरसागर

Kolhapur News: "महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास..."; निवडणुकीवर काय म्हणाले आमदार राजेश क्षीरसागर

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर:  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरवात झाली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी महायुतीबाबत सकारात्मक वातावरण आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली लाडकी बहीण योजना, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत घेतले जात असलेले लोकहिताचे निर्णय यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा कौल महायुतीच्या बाजूनेच आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास महायुती सक्षम आहे. परंतु, गाफील न राहता नवीन सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, शाखा उद्घाटन, शासनाच्या योजना यामाध्यमातून जनसंपर्क वाढवा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळांचे कार्यकरी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आ. क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, रणजीत मंडलिक, दीपक चव्हाण, शहर समन्वयक सुनील जाधव, गणेश रांगणेकर, कमलाकर जगदाळे, तन्वीर बेपारी, अनुसूचित जाती जमाती शहरप्रमुख प्रभू गायकवाड, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, अंकुश निपाणीकर, विनय वाणी, मुकुंद सावंत, कपिल केसरकर, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, संदीप चीगरे, देवेंद्र खराडे, मुन्ना तोरस्कर, अमर क्षीरसागर आदी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील मतदार महायुतीच्या बाजुनेचं

आमदार क्षीरसागर म्हणाले, गेल्या तीन वर्षांच्या काळात महायुती सरकारने लाडकी बहीण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, एस.टी.प्रवासात  सवलत असे जनहिताचे निर्णय घेतले. कोल्हापूर शहराचा विचार करता महानगरपालिकेत ५०६ कंत्राटी कर्मचारी कायम करणे, रु.१०० कोटींचे रस्ते, केशवराव भोसले नाट्यगृह संवर्धन व पुनर्बांधणी, रंकाळा तलाव सुशोभिकरण, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका या सर्वांचा सारासार विचार करता शहरातील मतदार महायुतीच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शहर विकासाद्वारे शहराचे बदलत चाललेले रुप त्यातून मतदारांच्या व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया यातून नागरिकांनीच महायुतीला निवडून देण्याचे मनोमन ठरविले आहे. त्यामुळे विविध माध्यमातून जनसंपर्क निर्माण करण्यावर भर द्यावे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. येणारी महानगरपालिका महायुती एकजुटीने लढवून, जिंकून दाखवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आगामी महानगर पालिका निवडणुक जिंकणारच…

आमदार क्षीरसागर म्हणाले, आगामी महानगरपालिका महायुती सक्षमपणे लढवून जिंकणारच आहे. एकूणच राज्यात महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकजुटीने सुरु केलेली लोकहिताच्या कामाची पद्धत नागरिकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सामील होण्यासाठी अनेकांची रीघ लागली आहे. येणाऱ्या सर्वांचे स्वागतच आहे, परंतु, महायुती कोणावरही अवलंबून नाही हे गेल्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर आणि मतदारांनी दिलेल्या कौलावर दिसून आले आहे.

Web Title: Mla rajesh kshirsagar said mahayuti will strong for win local body elections kolhapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • kolhapur news
  • Local Body Elections
  • Rajesh Kshirsagar

संबंधित बातम्या

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक
1

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक

चेअरमन नविद मुश्रीफ माझे भाऊ…त्यांच्या विरोधात कशी जाऊ? शौमिका महाडिक यांची भावनिक साद
2

चेअरमन नविद मुश्रीफ माझे भाऊ…त्यांच्या विरोधात कशी जाऊ? शौमिका महाडिक यांची भावनिक साद

Kolhapur News: खेळून खेळून दमला, आईच्या मांडीवर डोके ठेवले अन्…; 10 वर्षांच्या लेकराचा नियतीने घेतला क्रूर बळी
3

Kolhapur News: खेळून खेळून दमला, आईच्या मांडीवर डोके ठेवले अन्…; 10 वर्षांच्या लेकराचा नियतीने घेतला क्रूर बळी

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान वागणूक
4

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान वागणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.