'कास'ची सुरक्षाव्यवस्था पुन्हा रामभरोसे ; दोघांवर एकशेचाळीस हेक्टरची मदार
सातारा शहराची तसेच तालुक्यातील सोळा गावांची वर्षभर पाण्याची तहान भागवणाऱ्या कास तलावाची सुरक्षा व्यवस्था एका दुर्दैवी घटनेने अधोरेखित झाली आहे. नऊ वर्षाच्या राकेश विश्वकर्मा या मुलाचा कास तलावात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा उगम स्थळाची सुरक्षा व्यवस्थाराम भरोसे राहिली आहे. कास तलावाच्या १४० हेक्टरच्या सुरक्षिततेसाठी केवळ दोन नळकरी असल्याने दुर्दैवी घटनांना पायबंद घालणे अडचणीचे होत आहे. सातारकरांसाठी शनिवार, रविवार हक्काचा पिकनिक स्पॉट म्हणून कास तलाव अत्यंत लोकप्रिय आहे. या तलावाचा १४० हेक्टरचा परिसर हा जावली तालुक्यात येतो. मात्र उत्साहाच्या भरात पाण्यात जाणे, पाण्यात उडी मारून धाडसाने पोहण्याचा आतातायीपणा करणे, धरणाच्या भिंतीवर वाहन घेऊन जाणे, मेजवान्या करून दारूच्या बाटल्या तेथेच फोडणे असे सर्रास प्रकार येथे चालतात. या सर्व घटनांवर कार्यक्षेत्र असणाऱ्या मेढा पोलीस स्टेशनचे ५९ पोलिस कर्मचारी काहीही करू शकत नाही.
वाळूगट, खाणपट्टयांच्या परवानगीचा कालावधी कमी करा; मंत्री बावनकुळे यांची पर्यावरण विभागाला सूचना
मेढा पोलिसांची होतेय कसरत
मुळात कास तलाव ते मेडा पोलिस स्टेशन हे अंतर ४१ किलोमीटर आहे. त्यामुळे तेथे स्वमालकीच्या क्षेत्रात सुरक्षा व्यवस्था लावणे हे सातारा पालिकेचे काम आहे. याबावतची माहिती घेतली असता सर्व परिसर हा दोन नळकऱ्यांवर अवलंबून आहे. अशावेळी दुर्दैवी घटना घडल्यास शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रेकर्स ग्रुपला प्राचारण करावे लागते.
धरणाच्या भिंतीवर जाण्याची स्पर्धा
सातारा नगरपालिकेने कास तलाव धरणाची उंची वाढवली आणि सातारकरांना अर्धा टीएमसी पाणी वर्षभरासाठी उपलब्ध झाले. मात्र सुरक्षा व्यवस्थेत कोणतेही प्रावधान येथे नाही. कास तलावाच्या पश्चिमेला दाट झाडी असल्याने त्या दिशेने कोणीही या तलावात उतरण्याचे धाडस करत नाही मात्र कास गावाकडून धरणाच्या भिंतीकडे जाणारा रस्ता पालिकेने खोदून ठेवला आहे. धरणाच्या भिंतीचा रस्ता गेटने बंद करण्यात आला आहे. तरीसुद्धा वाहनसह धरणाच्या भिंतीवर जाण्याची स्पर्धा लागलेली असते.
Thane News : ठाणेकरांचा पाणी प्रश्न सुटणार, धरण उभारणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
चेनलिंक जाळीचा प्रस्ताव
कास तलावाच्या जुन्या बंगल्याजवळ साधारण पंधरा फूट कास तलाव खोल असून साधारण सात ते आठ फुटापर्यंत गाळाने तो भरला आहे. त्यामुळे येथे दुर्दैवी घटना घडल्यास बचाव कार्य राबविणे अवघड होते. सातारा नगरपालिकेने याबाबत तातडीने विचार करून कास तलावाच्या प्रवेश कल्या बाजूने चेनलिंग जाळी बसवण्याची प्रक्रिया प्रस्तावित केली आहे. कास तलावाच्या अधिक सुरक्षिततेसाठी किमान सहा सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे.