ठाणेकरांचा पाणी प्रश्न सुटणार, धरण उभारणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यात राज्य सरकार दोन धरणे बांधणार आहे. ठाणे जिल्ह्याची पाण्याची तहान भागविण्यासाठी ही धरणे बांधली जाणार असून पोश्री नदीवर बोरगाव येथे पोशीर धरण तर चील्हार नदीवर शिलार येथे दुसरं धरण बांधण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दरम्यान,पोशीर धरणासाठी 6394 कोटींच्या तर शिलार धरणासाठी4869 कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
भीमाशंकर अभयारण्य आणि येथील डोंगरात उगम पावलेली पोश्री नदीवर बोरगाव आणि कुरुंग गावांच्या हद्दीत धरण बांधले जाणार आहे.कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत मधील या भागात धरण बांधण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने 1973 मध्ये जाहीर केले होते. 2005 मध्ये महाराष्ट्र सरकार कडून कर्जत तालुक्यातील बोरगाव येथे धरण बांधण्याचे निश्चित झाल्यावर पहिल्यांदा प्राधिकरण कडून सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला आहे.त्यानंतर धरणाचे सर्वेक्षण करणेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक ग्रामस्थ पिटाळून लावत होते.
त्यामुळे बोरगाव येथे होणाऱ्याधरणालशेतकऱ्यांप्रचंडविरोधआहे.बोरगाव,चई,चेवणे,उंबरखांड,भोपळेवाडी,पेंढरी आणि बोन्डेशेत ही गावे विस्थापित होणार आहे. शेतकर्यांचा विरोध असलेल्या या धरणाच्या कामासाठी राज्य सरकारने आज 20 मे रोजीच्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून 6394 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
Raigad News : विषारी पाण्यामुळे मोठी दुर्घटना;तलावातील शेकडो मासे मृत
कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या असलेले चिल्लार नदीचे पाणी अडविले जाणार आहे.जामरुंग येथे उगम पावणारी चिल्लार नदी उन्हाळ्यात कोरडी असते आणि त्यामुळे या नदीचे पाणी पावसाळ्यात अडवून धरण बांधण्याचे कामाला मंजुरी देण्यात आली आहे.कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील शिलार,धोत्रे, धोत्रे वाडी या भागात नवीन धरण होणार असून या धरणाच्या कामासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4869 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. शिलार धरणामुळे भविष्यात चिल्लार नदी बारमाही वाहती होणार असून उल्हास नदीवर कोंढाणा धरण बांधले जाणार असल्याने कर्जत तालुक्याच्या पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविली जाणार आहे हे जवळपास नक्की झाले आहे.