
एव्हरेस्टवरून झेप घेणारा 'पट्टेरी हंस' सुर्याचीवाडीत दाखल
खटाव तालुक्यातील मायणी, येरळवाडी, कानकात्रे या तलावात दरवर्षी देशी-विदेशी पक्षी हजेरी लावतात. या तलावात अजूनही देखण्या फ्लेमिंगो पक्षांनी हजेरी लावली नसलीतरी इतर पक्षांनी तलाव बहरला आहे. तलाव परिसरात थंडी व दलदल वाढत चालल्यामुळे या तलावात पाणथळी पक्षी दाखल होत आहेत.त्यामुळे पक्षीनिरीक्षकांच्या आनंदात भर पडली आहे. या तलावात तलावाच्या पश्चियमेच्या उथळ,पाणथळ जागेत अन्नाच्या शोधात पक्षांचे थवे दिसत आहे. त्यात जगात सर्वाधिक उंचीच्या ‘माऊंट एव्हरेस्ट’ या शिखरावरुनही झेपावणारा पट्टेरी हंस हा तलावाचे मुख्य आकर्षण झाले आहे. त्याची ‘ द हिमालयीन एअरलाईन’ म्हणूनही पक्षी जगतात ओळख आहे. हा पक्षी सलग १७ तासांचा न थांबता प्रवास करतो म्हणून त्यास ‘द हिमालयीन ट्रान्स’ असेही म्हणतात.
तलावाच्या पश्चिाम भागात उत्तरेकडील गवतावर अन्नाच्या शोधात हे पक्षी दिसत आहेत. करड्या रंगाचे,डोके व मानेच्या दोन्ही बाजूस , मानेवरुन मागील भागावर काळ्या रंगाच्या रेषा व हळदीसारखी चोच असे देखणी पक्षी तलावात दाखल झाले आहेत. असा त्यांचा पेहराव दिसतो. हे पक्षी तिबेट,कझाकस्थान,मंगोलीया या देशातून तलावात दाखल झाले आहेत.
थंडीतली पर्वणी..गुलाबी पंखाची प्रतिक्षा
या तलावात नदीसुरय, स्पून बिल, चक्रांग बदक, कांडेसर,चित्रबलाक, कवड्या खंड्या, पांढरा-पिवळा परीट,पाणकावळा, पाणबुडी,शेकाट्या,खंड्या,कवड्या,शेकाट्या, तुतारी,तिमळी,जांभळी पाणकोंबडी, पाणपाकोळी, पाणकाड्या बगळा,राखी बगळा,चक्रवाक,सुगरण,बुलबुल,तितर,चंडोल,कोतवाल, पंचरंगी सूर्यपक्षी,घार,खाटीक,हुदहुद, दाखल झाले आहेत.
चिखल्या, मोरशराटी, कोतवाल, हळदीकुंकू बदक, काश्मि्री बदक आदी. पक्षी दाखल झाले असून लवकरच रोहीत पक्षीही दाखल होतील. – अंकुश चव्हाण, पक्षीमित्र मायणी, ता.खटाव