कार्यालय आणि उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताह निमित्त ‘खेळ आठवणीतले गावाकडचे!’ हा पारंपरिक खेळांचा कार्यक्रम उत्तूर विद्यालयाच्या मैदानावर उत्साहात पार पडला. तालुका क्रीडा अधिकारी मनीषा पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी सचिव प्रा. एन. टी ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.मोबाईल, सोशल मीडिया आणि टी.व्ही. च्या विळख्यात सापडलेल्या लहान मुलांना आपल्या पारंपरिक खेळांची ओळख व्हावी आणि त्यातून विविध गुण आत्मसात व्हावेत, यासाठी उत्तूर विद्यालयाच्या मैदानावर जवळपास 300 विद्यार्थ्यांनी अनेक पारंपरिक खेळ साजरे केले.
यामध्ये विठू दांडू, भातुकली, आबाधुवी, लगोरी, काचाकवड्या, जिभली, जू फिरवणे, छकडा गाडी, भोवरा, पतंग, आट्यापाट्या, दोरी उड्या, झुकझुक गाडी असे अनेक जुने नानाविध खेळ सादर केले. या खेळांच्या विषयी मुलांना माहिती झाली. या खेळांचे महत्त्वही मुलांना कळाले. शारीरिक व्यायामाबरोबर बौद्धिक व्यायाम तसेच सांघिक वृत्ती वाढीस लागणे आणि मोबाईलपासून दूर राहणे यासारखे महत्त्व या पारंपरिक खेळांचा समावेश आहे. यावेळी बी. व्ही. पाटील, संदीप बादरे, तानाजी कांबळे, कविता व्हनबट्टे, उमाराणी जाधव उपस्थित होते.
मुले पारंपरिक खेळ खेळत होती. त्यांना पाहून तालुका क्रीडा अधिकारी मनिषा पाटील यांनाही खेळण्याचा मोह आवरला नाही. पाटीलही मुलांसोबत खेळात रमल्या. विद्यार्थी देखील त्यांच्या सोबत खेळू लागले. प्राचार्य आर. डी. महापुरे यांनी स्वागत केले. कलाशिक्षक इंद्रजित बंदसोडे यांनी खेळाविषयी माहिती दिली.
Ans: हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, उत्तूर यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
Ans: कार्यालय आणि उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताह निमित्त हा कार्यक्रम राबवण्यात आला.
Ans: : तालुका क्रीडा अधिकारी मनीषा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.






