Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत; वनविभागाचे अधिकारी हतबल

चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना गवे, हत्ती, बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, रानडुक्करे, वनगायी आदी रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीकऱ्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 25, 2025 | 04:07 PM
Kolhapur News : चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत; वनविभागाचे अधिकारी हतबल
Follow Us
Close
Follow Us:
  • चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
  • शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत
  • वनविभागाचे अधिकारी हतबल
कोल्हापूर/ विजयकुमार कांबळे : चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना गवे, हत्ती, बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, रानडुक्करे, वनगायी आदी रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीकऱ्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे. तालुक्यातील पूर्व भागातील चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी, तर पश्चिम भागातील गवसे, इब्राहिमपूर, बुझवडे, कानूर भोगोली, पिळणी, सडेगुडवळे, यासह तालुक्यातील अडकूर, विंझणे, मोरेवाडी, सोनारवाडी, लक्कीकट्टे, हेरे, इसापूर कळसगादे, तिलारीनगर, पाटणे, तुर्केवाडी माडवळे, हाजगोळी, मोटणवाडी, वाघोत्रे, जंगमहट्टी, कोकरे, आडूरे, नागवे आदी गावातून या रानटी प्राण्यांच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांना जिवन जगणेच कठीण झाले आहे. रानटी प्राण्यांच्या भितीने शेतकरीच नव्हे तर या मार्गावरून प्रवास करताना सुध्दा भितीच्या छायेखालीच जिवमुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. जंगलात वास्तव्यास असणाऱ्या प्राण्यांनी आता अलीकडच्या काळात खेडेगावातील वाडी वस्ती, तसेच शहरातील गजबजलेल्या नागरी वस्तीच्या ठिकाणी प्रवेश केल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तर अक्षरशः वैतागले आहेत. चंदगड तालुक्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. घनदाट जंगल संपत्ती, घटप्रभा, ताम्रपर्णी नद्या बारमाही पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच जंगमहट्टी, फाटकवाडी, सोनारवाडी, क्कीकट्टे, जांबरे, काजिर्णे, हेरे, कुदनुर, पाटणे, आदींसह तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील, विधानसभेचे अध्यक्ष नामदार कै. बाबासाहेब कुपेकर आदी नेतेमंडळीच्या प्रयत्नातून पाटबंधारे विभागाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पिण्याच्या, व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्या मुळे शेतक-यांनी मोठ्याप्रमाणात ऊसाच्या पिकांची लागवड केली आहे. तर डोंगर कपारीतील झाडांची ठेकेदारांनी मोठ्याप्रमाणात कत्तल केल्यामुळेच या प्राण्यांनी आता आपला मोर्चा शेतातील उभ्या ऊस, मक्का, भात, नाचणी आदी पिकांकडेआणि गावाच्या दिशेने वळविला आहे.

हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल

तोडणीसाठी ऊस गेलेल्या फडात दिसले हत्ती

सद्या ऊसाच्या तोडणीसाठी गावा-गावात टोळ्या सुरू झाल्या आहेत. शेतक-याचे ऊस तोडणी करून गाळपासाठी कारखान्याकडे पाठविले जात आहेत. पण ऊस तोडणीसाठी गेलेल्या फडात हत्ती दिसल्याने मालकांची आणि तोडणी कामगारांची घाबरगुंडी उडाली आहे. तर तुटून गेलेल्या ऊसाच्या खोडव्याला पाणी पाजण्यासाठी शेतात जावे लागते. ऊसा बरोबरच शेतकऱ्यांना चांगला दर देणार पिक म्हणजे काजू होय. काजू झाडांना मोहोर आला असल्यास झाडे सफाईचे काम करावे लागते. मात्र हत्ती, अस्वल, आणि बिबट्‌याच्या भितीने शेतकऱ्यांनी शिवारात जाणेच टाळले आहे. या वन्यप्राण्यांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला उपद्रव शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरला आहे. तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Nashik Crime: ऑनलाईन हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडलं महागात! सायबर भामट्यांनी नाशिकमध्ये दोन जणांना लावला लाखांचा चुना

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंदगड तालुक्यात कोणत्या वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे?

    Ans: चंदगड तालुक्यात गवे, हत्ती, बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, रानडुक्कर आणि वनगायी यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे.

  • Que: तालुक्यातील कोणत्या गावांना या समस्येचा जास्त फटका बसत आहे?

    Ans: पूर्व भागातील चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी तसेच पश्चिम भागातील गवसे, इब्राहिमपूर, बुझवडे, कानूर भोगोली, पिळणी, सडेगुडवळे यांसह अडकूर, विंझणे, मोरेवाडी, सोनारवाडी, हेरे, इसापूर, तिलारीनगर, पाटणे, वाघोत्रे, नागवे आदी अनेक गावांमध्ये ही समस्या तीव्र आहे.

  • Que: वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत?

    Ans: शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतात जाणे धोकादायक झाले असून ऊस, भात, मक्का, नाचणी, काजू यांसारखी पिके धोक्यात आली आहेत.

Web Title: Wild animals swarm in chandgad taluka panic among farmers travelers forest department officials desperate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • kolhapur news

संबंधित बातम्या

ब्रिजस्टोन इंडियातर्फे शिक्षण क्षेत्रात महत्वाचं पाऊल; जैवविविधता प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सेंटरची उभारणी
1

ब्रिजस्टोन इंडियातर्फे शिक्षण क्षेत्रात महत्वाचं पाऊल; जैवविविधता प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सेंटरची उभारणी

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप
2

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

E-Peek Pahani Survey: ई-पिक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा; ऑफलाईन पिक पाहणीसाठी 24 डिसेंबरपर्यंत अर्ज
3

E-Peek Pahani Survey: ई-पिक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा; ऑफलाईन पिक पाहणीसाठी 24 डिसेंबरपर्यंत अर्ज

Kolhapur : जोतिबा डोंगरावर केदारण्य प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विकास आराखड्याची अंबलबजावणी जलद गतीने सुरु
4

Kolhapur : जोतिबा डोंगरावर केदारण्य प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विकास आराखड्याची अंबलबजावणी जलद गतीने सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.