ऑनलाईन हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडलं महागात! (Photo Credit- AI)
नेमकी घटना काय घडली?
हनुमाननगर भागात राहणाऱ्या नोकरदार महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. नियमीत आरोग्य तपासणीसाठी महिलेने गेल्या १८ ऑक्टोबर रोजी जस्ट डायल वर संपर्क साधून पिंप्रीकर हॉस्पिटलचा नंबर मिळवला होता. यानंतर ९३४१६७०१३४ या मोबाईल क्रमांकावरून महिलेशी संपर्क साधण्यात आला.
अशी झाली फसवणूक
संबधिताने सदर हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे सांगून नंबर लावण्यासाठी व्हॉटसअपवर पाठविलेल्या लिंकवर माहिती भरण्यास सांगून ही फसवणुक केली. महिलेने सदर लिंकवर आपली गोपनीय माहिती भरली असता रविवारी (दि.२१) सायंकाळी तिच्या बँक खात्यातील १ लाख ३९ हजाराची रोकड परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेण्यात आली. याच प्रमाणे श्रीरामनगर भागात राहणारे महेंद्र उत्तम कापसे यांची सुद्धा सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील ८८ हजार रूपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन काढून घेतली.
पोलिसांचे आवाहन: अशी घ्या काळजी!
अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक पाटील करीत आहेत. गुगलवर समोर दिसणाऱ्या नंबरवर थेट क्रमांक लावण्याऐवजी नागरिकांनी तो टिपून मग डायल करणे उचित ठरते. यामुळे सायबर चोरट्यांना वापरकर्ता ऑनलाईन पद्धतीने कोठे कॉल करतो, याची माहिती मिळत नाही. गुगल सर्च करताना अशा खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या हव्यात, असे मत सायबर पोलिसांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा: हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल






