Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष संघटनेचे उपोषण स्थगित, प्रश्न न सुटल्यास २३ फेबुवारीपासुन बेमुदत उपोषण

राजन तेली यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने हे उपोषण तात्पुरते स्थगित केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 27, 2024 | 11:52 AM
कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष संघटनेचे उपोषण स्थगित, प्रश्न न सुटल्यास २३ फेबुवारीपासुन बेमुदत उपोषण
Follow Us
Close
Follow Us:

सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनस आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी केंद्रिय रेल्वेमंत्री यांची फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात भेट घालून देतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या मध्यस्थीने दिले होते. तसेच राजन तेली यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने हे उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या २३ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत लाक्षलक्ष केंद्रित करण्याकरता उपोषण छेडण्यात येत आलं. सायंकाळी माजी आमदार राजन तेली यांनी प्रतिनिधी म्हणून या उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी उपोषणकर्त्यांचा भ्रमणध्वनीवरून संवाद करून दिला. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. राणेंनी दिलेल्या आश्वासनानंतर हे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आलं. केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घडवून देत दोन प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मंत्री राणेंनी दिल्यानं आम्ही तुर्त हे उपोषण स्थगित करीत आहोत. परंतु, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास २३ फेब्रुवारीपासून याच ठिकाणी ‘आमरण उपोषण’ छेडणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर यांनी दिली.

दिवसभरात हजारो नागरिक, विविध संघटनांनी या लाक्षणिक उपोषणला पाठिंबा दिला. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने देखील आपला पाठिंबा याला जाहीर केला. यासह मडूरा, सिधुदुर्ग रेल्वेस्टेशन सह अनेक रेल्वेस्टेशन प्रवाशी संघटना सहभागी होत्या. सायंकाळी माजी आमदार राजन तेली यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फोनवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद करून दिला. यावेळी मंत्री राणे म्हणाले, कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी यासाठी माझा प्रयत्न आहे. कोकण रेल्वेवर सहा हजार कोटीच कर्ज आहे. त्यामुळे कोकण रेल्वेकडून विकास काहीही होत नाही. यासंदर्भातील पत्र राज्य सरकारनं केंद्र सरकारला दिलेल आहे. प्रा मधू दंडवते यांचे नामकरणाबाबत मी आत्ताच आश्वासन देऊ शकत नाही. मात्र, उर्वरीत विषयांसाठी मी पुढाकार घेईन, प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्यासोबत बैठक लावून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असं ठोस आश्वासन मंत्री नारायण राणे यांनी दिलं. माजी आमदार राजन तेली यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन लावत उपोषणकर्त्यांशी संवाद साधून दिला. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर म्हणाले, माजी आमदार राजन तेली यांनी उपोषणकर्त्यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा करून दिली. रेल्वे टर्मिनस व रेल्वे गाड्यांच्या थांब्याबाबतच्या मागण्या मान्य होण्यासारख्या आहेत. त्यासाठी येत्या ७ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घडवून देण्याचं आश्वासन मंत्री नारायण राणे यांनी दिलं. त्यांच्यासमक्ष या मागण्या मंजूर करून देतो असं त्यांनी आश्वास्त केलं आहे‌. केंद्रीय मंत्री राणेंवर विश्वास ठेवून आजच लाक्षणिक उपोषण आम्ही तात्पुरत स्थगित करत आहोत. आंदोलन स्थगित केलं असल तरी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. जर २३ फेब्रुवारी पर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्या दिवसापासून आम्ही आमरण उपोषणाला याच ठिकाणी बसणार आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्या तर त्याबाबत काय करायचं हा निर्णय घेऊ, मंत्री नारायण राणेंचा व त्यांनी दिलेल्या शब्दाचा आदर करत आजच उपोषण तुर्त स्थगित करत आहोत अशी माहिती अँड. निंबाळकर यांनी दिली.

याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष शांताराम नाईक, प्रमुख राजू कांबळे, संजय सावंत, रुपेश दर्गे, यशवंत जडयार, प्रमोद गावडे,अभिमन्यू लोंढे, भुषण बांदिवडेकर, शेखर पाडगांवकर, भाई देऊलकर, महेश परूळेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, पुंडलिक दळवी, सागर नाणोसकर, सागर तळवडेकर, भुषण बांदिवडेकर, रविंद्र ओगले, शुभम परब, परशुराम परब, विहंग गोठोस्कर, सुधीर राऊळ, सीमा मठकर, नागेश ओरोसकर, प्रकाश पावसकर, स्वप्नील गावडे, कल्पना बांदेकर, सायली दुभाषी, विनायक गांवस, कृष्णा भोगवेकर राज पवार, तेजस पोयेकर, गुरुदास गवंडे, अजय मयेकर, विनायक अणावकर, समीर वंजारी, आदी उपस्थित होते.

Web Title: Konkan rail pravasi sangharsh sanghsanthana suspends hunger strike indefinite hunger strike from 23rd february if issue is not resolved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2024 | 11:52 AM

Topics:  

  • hunger strike
  • Maharashtra Government
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
4

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.