Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयना धरणाची पाणी पातळी घटली; बोटी वाहतूक ठप्प, पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम

Koyna River: कोयना धरणाची पाणी पातळी घटल्याने कोयना विभागातील १०५ गावांतील जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना बामणोली आणि तापोळा बाजारपेठ गाठण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे, त्यामुळे बोट वाहतूक ठप्प झाल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 06, 2026 | 08:57 PM
कोयना धरणाची पाणी पातळी घटली; बोटी वाहतूक ठप्प, पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम
Follow Us
Follow Us:
  • कोयना धरणाची पाणी पातळी घटली
  • बोटी वाहतूक ठप्प
  • पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाने तळ गाठल्याने कोयना विभागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून लोकांना मैलोनमैलाची पायपीट करावी लागत आहे. पुर्वीची जलाशयात बुडीत गावठाणातील घरांचे, मंदिरांचे अवशेष उघड्यावर पडले असून नदीच्या मुख्य प्रवाहात थोडेफार पाणी उरले असून १०५ गावांतील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः बामणोली, तापोळा आणि शेंबडी परिसरातील बोट वाहतूक पूर्णपणे बंद आहे. बोटी उघड्यावर पडल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटन व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत.

‘मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीमेवर डोळ्यांत तेल घालून काम करा’; श्रीकांत शिंदे यांचा जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश

कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे १०५ टीएमसी इतकी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरते त्या काळात हा परिसर निसर्ग सौंदर्याने बहरलेला दिसतो. हिरवाईने नटलेले डोंगर, विस्तीर्ण जलाशय आणि बोटींची वर्दळ यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटन फुलते. मात्र दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पाण्याची पातळी घटू लागल्यानंतर शिवसागर जलाशयाचे चित्र पूर्णपणे बदलते. पाणी आटल्याने परिसर ओसाड आणि विराण दिसू लागतो.

या भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पर्यटन आणि बोट व्यवसायावर अवलंबून आहे. बोट वाहतूक बंद झाल्याने त्यांच्या रोजगारावर थेट परिणाम झाला असून आर्थिक संकट उभे राहिले आहे. तसेच कांदाटी खोरे, सोळशी खोरे, खरोशी-रेणोशी खोरे या दुर्गम भागांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी जलमार्गाने सहज पोहोचता येणाऱ्या ठिकाणी आता नागरिकांना मैलोनमैल पायपीट करून बामणोली किंवा तापोळा बाजारपेठ गाठावी लागत आहे. त्यानंतर सातारा किंवा महाबळेश्वरकडे पुढील प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

पाण्याखालची गावे पुन्हा दिसू लागली

जलाशयातील पाणी पातळी घटल्याने अनेक वर्षांपासून पाण्याखाली गेलेली जुनी गावे, घरांचे अवशेष तसेच मंदिरांचे भग्नावशेष पुन्हा दिसू लागले आहेत. त्यामुळे परिसरात पुनर्वसित झालेल्या गावांतील नागरिक आपल्या जुन्या गावांना भेटी देत आहेत. अनेक जण आपल्या पूर्वीच्या घरांचे अवशेष आणि मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

Washim News : वाशिम जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लीग स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

Web Title: Koyna dam water level drop shiv sagar reservoir maharashtra crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Koyna
  • Koyna Dam

संबंधित बातम्या

St Bus News: महाबळेश्वर एसटीचा ‘राम भरोसे’ प्रवास अखेर संपला! १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल
1

St Bus News: महाबळेश्वर एसटीचा ‘राम भरोसे’ प्रवास अखेर संपला! १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.