Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृष्णा कारखाना निवडणूक : ‘कपबशी’ विरुद्ध ‘नारळ’ लढत, दोन अपक्षांना ट्रॅक्टर व शिट्टी

कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण १३९ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर त्यापैकी १२२ अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघारीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 11, 2026 | 11:19 AM
कृष्णा कारखाना निवडणूक : 'कपबशी' विरुद्ध 'नारळ' लढत, दोन अपक्षांना ट्रॅक्टर व शिट्टी

कृष्णा कारखाना निवडणूक : 'कपबशी' विरुद्ध 'नारळ' लढत, दोन अपक्षांना ट्रॅक्टर व शिट्टी

Follow Us
Follow Us:

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या चिन्हवाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलला ‘कपबशी’, तर विरोधी संस्थापक पॅनेलला ‘नारळ’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी झालेल्या प्रक्रियेत दोन्ही प्रमुख पॅनेलसह रिंगणात राहिलेल्या अपक्ष उमेदवारांनाही चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये वडगाव हवेली-दुशेरे गटातील अपक्ष उमेदवार विश्वास पांडुरंग जाधव यांना ‘ट्रॅक्टर’, तर बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटातील अपक्ष उमेदवार महेश राजाराम पवार यांना ‘शिट्टी’ हे चिन्ह देण्यात आले.

कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण १३९ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर त्यापैकी १२२ अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघारीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. अंतिम दिवशी ५३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ४४ वर आली आहे.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी ! जलपुरवठा यंत्रणा हायटेक करण्यासाठी पालिकेची उपाययोजना, नागरिकांना मिळणार शुद्ध हवा-पाणी

यंदाच्या निवडणुकीत सहकार पॅनेल आणि संस्थापक पॅनेल यांच्यात सरळ सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, दोन्ही बाजूंनी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बैठका, संपर्क दौरे आणि प्रचार नियोजनाला वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी सांगितले की, चिन्हवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारांची चिन्हांकित अंतिम यादी आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी २१ जून रोजी मतदान, तर २३ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात निवडणुकीची चुरस आणखी वाढणार आहे.

Monsoon News : महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल मंदावली; पुढील तीन दिवसांत प्रगतीची शक्यता, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

Web Title: Krishna factory election two independents allotted tractor and whistle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
1

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
2

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
3

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी
4

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.