Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Rain: कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याने ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श; वाईत भाविकांची गर्दी

Satara Rain: सातारा जिल्ह्यातील दमदार पावसामुळे कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाई येथील प्रसिद्ध ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श केला आहे. या धार्मिक क्षणाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असून, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने पुराच्या पाण्यात उतरून दर्शन घेण्यास बंदी घातली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 03, 2026 | 02:57 PM
कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याने ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श; वाईत भाविकांची गर्दी

कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याने ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श; वाईत भाविकांची गर्दी

Follow Us
Follow Us:
  • कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याने ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श
  • भाविकांमध्ये भक्तिभाव, व्यापाऱ्यांवर मात्र संकट
  • श्रद्धा आणि समृद्धीचे मानले जातात संकेत
वाई : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला असून, पुराच्या पाण्याने वाईचे ग्रामदैवत आणि राज्यभर प्रसिद्ध असलेल्या ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श केला आहे. हा क्षण पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असली, तरी सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने पुराच्या पाण्यात उतरून दर्शन घेण्यास बंदी घातली आहे.

धोम धरणातून शुक्रवार (३१ जुलै) रोजी रात्री सुमारे ८ वाजता ७,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यानंतर पुराचे पाणी महागणपती मंदिरापर्यंत पोहोचले आणि गणरायाच्या चरणांना स्पर्श करून मंदिर परिसराला वेढा दिला. पाण्याचा वेढा असूनही अनेक भाविक सुरक्षित अंतरावरून गणरायाचे दर्शन घेताना दिसत आहेत.

Karad News: कराडच्या राजकारणात ‘यशवंत’ विचारांची कसोटी! सेस फंडावरून पंचायत समितीत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

वाई तालुक्यात अशी श्रद्धा आहे की, कृष्णामाईचे पाणी ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श करते, तेव्हा तालुक्यातील पाणीटंचाई दूर होऊन समृद्धीचे संकेत मिळतात. त्यामुळे यंदाही पुराच्या या घटनेकडे अनेकांनी श्रद्धेने पाहिले असून, समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुरामुळे कृष्णा नदीतील मोठ्या प्रमाणावरील जलपर्णी वाहून गेल्याने नदीपात्र स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक मानली जात आहे.

महागणपती मंदिरालगतचा पूल काही काळ पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पर्यायी पुलावर वळवावी लागली. परिणामी शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. उपलब्ध मनुष्यबळ मर्यादित असल्याने पोलिसांवर अतिरिक्त ताण जाणवत होता.

पूराच्या पाण्याचा फटका मंदिर परिसरातील व्यावसायिकांनाही बसला आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकाने बंद ठेवावी लागली. व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलवला असला, तरी काही दिवस व्यवसाय ठप्प राहण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महागणपती मंदिरालगतच्या पुलाची उंची वाढविणे, पुलावरील अतिक्रमणे हटविणे आणि भविष्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. श्रद्धा, निसर्ग आणि प्रशासनाच्या आव्हानांचा संगम अनुभवायला मिळालेल्या या पुरामुळे वाईकरांना एकीकडे समाधानाचा भाव मिळाला असला, तरी दुसरीकडे पूरनियोजन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीची गरजही पुन्हा अधोरेखित झाली आहे.

वर्धापन दिनानिमित्त सातारा पालिकेचा हरित शहराचा संदेश, साताऱ्यातून भव्य रॅली शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

Web Title: Krishna river floodwaters touch dholya ganpati feet in wai devotees throng for darshan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Krishna River
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.