Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृष्णा कारखाना निवडणूक; सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ; वाढलेल्या टक्केवारीचा कौल कोणाला, उत्सुकता शिगेला

रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी आज कराडमध्ये होणार आहे. ८२.२६ टक्के मतदानानंतर जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल यांच्यातील लढतीचा निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 22, 2026 | 09:15 PM
कृष्णा कारखाना निवडणूक; सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ; वाढलेल्या टक्केवारीचा कौल कोणाला, उत्सुकता शिगेला

कृष्णा कारखाना निवडणूक; सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ; वाढलेल्या टक्केवारीचा कौल कोणाला, उत्सुकता शिगेला

Follow Us
Follow Us:

कराड/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर होणार असून, या निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल यांच्यात झालेल्या थेट लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत सभासदांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कराड येथील वखार महामंडळाच्या गोडाऊन क्रमांक ६, मार्केट यार्ड येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असून, परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात सभासदांनी सहभाग नोंदविला. सुमारे सात हजार मयत सभासद वगळल्यानंतर पात्र मतदारांमध्ये ८२.२६ टक्के मतदानाची नोंद झाली, तर अधिकृत मतदार यादीतील ५० हजार २५२ मतदारांच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी ७०.७६ इतकी राहिली. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २ हजार २६७ मतांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा कल कोणाच्या बाजूने गेला, याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

मतमोजणी दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या फेरीत ७७ टेबलांवर, तर दुसऱ्या फेरीत ७६ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलावर दोन्ही पॅनेलच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून, त्यांच्यासाठी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

मतमोजणी मतदान केंद्रनिहाय करण्यात येणार असून, सर्वप्रथम अनुसूचित जाती-जमाती, महिला प्रतिनिधी, इतर मागास प्रवर्ग तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग गटांची मतमोजणी होईल. त्यानंतर सर्वसाधारण ऊस उत्पादक गटांतील मतांची मोजणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. वडगाव हवेली-दुशेरे, कार्वे-काले, तांबवे-नेर्ले, बोरगाव-रेठरे हरणाक्ष, येडेमच्छिंद्र-वांगी, तसेच रेठरे बुद्रुक-शेणोली या सहा गटांतील मतांचे निकाल अनुक्रमे जाहीर केले जाणार आहेत.

या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. अर्चनाताई मोहिते यांच्या नेतृत्वाखालील कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रातील चर्चेचा विषय ठरली.

पाणीबंदीविरोधात कराडात शेतकऱ्यांचा एल्गार; कराड तहसील कार्यालयासमोर निदर्शने, उपसा बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाभर आंदोलन

कराडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव आणि खानापूर तालुक्यांमधील १५३ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले होते. आता मतपेट्यांमध्ये बंद झालेले दोन्ही पॅनेलचे राजकीय भवितव्य आज उघड होणार असल्याने नेते, उमेदवार, कार्यकर्ते आणि हजारो सभासदांच्या नजरा मतमोजणी केंद्राकडे लागल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कृष्णा कारखान्याच्या पुढील पाच वर्षांच्या नेतृत्वाचा फैसला आज होणार आहे.

Web Title: Krishna sugar factory election counting today karad result curiosity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Karad
  • Karad news
  • Satara

संबंधित बातम्या

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
1

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
2

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
3

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

बावधन गटातील शाळांचा शैक्षणिक दर्जा जिल्ह्यात अव्वल करणार; ऋतुजा शिंदेंचा निर्धार
4

बावधन गटातील शाळांचा शैक्षणिक दर्जा जिल्ह्यात अव्वल करणार; ऋतुजा शिंदेंचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.