
Ladki Bahin Yojana December installment deposited 3 thousand said aditi tatkare
महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. यंदाच्या महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याची आनंदाची बातमी आदिती तटकरे दिली आहे. यंदा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होतील. त्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे जमा होतील. बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये एकच उत्साह निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा : पुतिन राजघाटावर दाखल! वाहिली महात्मा गांधींना श्रद्धांजली; Visitor Book मध्ये लिहिला खास संदेश
डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे. मात्र लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. माध्यमातील काही वृत्तानुसार, यावेळी नोव्हेंबर आणि डिसेबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होणार आहे. असे झाले तर लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार 3000 रुपये जमा करेल. अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का जमा करण्यात आला नाही याबाबत संशय निर्माण झाला आहे. मात्र या सर्व महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचा हप्ता जमा होईल असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : रत्नागिरीत महिलाराज! Local Body Election मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे मतदान
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या मतदान पार पडले. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या निवडणूका होणार आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी निकाल हाती लागणार आहे. मुळेच बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. यापूर्वी गेल्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात एकाचवेळी दोन महिन्यांची रक्कम जमा झाली होती. त्यावेळी महिलांना एकदाच 3,000 रुपये मिलाले होते. एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही.