Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार; उद्धव ठाकरे-वडेट्टीवार यांच्यात चर्चा

चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसावा म्हणून शिवसेने (उबाठा) चे ६ आणि वंचितच्या २ नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 28, 2026 | 08:09 AM
चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार; उद्धव ठाकरे-वडेट्टीवार यांच्यात चर्चा

चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार; उद्धव ठाकरे-वडेट्टीवार यांच्यात चर्चा

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून भाजपसह इतर अनेक पक्षांकडून महापालिका सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच आता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर व्हावा, यासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याची सकारात्मक चर्चा झाली.

चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसावा म्हणून शिवसेने (उबाठा) चे ६ आणि वंचितच्या २ नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, यासाठी विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये ३० मिनिटे झालेल्या चर्चेत शिवसेनेकडून अडीच वर्ष महापौर आणि स्थायी समिती पदाची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून काँग्रेस बरोबर पुढील चर्चेची जबाबदारी खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत यांना देण्यात आली आहे. ‘मातोश्री’वर झालेल्या चर्चेनंतर वडेट्टीवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत ‘मातोश्री’ भेटीचा तपशील देत त्यांच्याशी चर्चा केली.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार

दरम्यान, चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर व्हावा हे माझे प्राधान्य आहे. अकोला आणि परभणी इथे शिवसेने (उबाठा) ला काँग्रेसची मदत लागणार आहे. तसेच चंद्रपुरात काँग्रेसला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज आहे. याबाबत चर्चा होऊन लवकरच तोडगा निघेल. हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा ‘मातोश्री’बरोबर चर्चा करतील, असे काँग्रेस विधिमंडळनेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसचा गट संपर्कात असल्याचा दावा केला. हा दावा म्हणजे तोंडाच्या वाफा काढणे आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

मावळ तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र

मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या पाच पक्षांनी तालुक्यातील एकूण १५ जागांवर आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यावर एकमत केले आहे.

Web Title: Possibility of maha vikas aghadi coming together in chandrapur municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Maha Vikas Aghadi
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
4

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.