जिल्ह्यामध्ये महिला मतदारच 'नंबर वन' (फोटो- istockphoto)
जिल्ह्यामध्ये महिला मतदारच ‘नंबर वन’
निकाल कणाच्या बाजूने लागणार ? वळले लक्ष
अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करण्यात यश
गुहागर: रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Election)वारे वाहत असताना जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त महिलांनी मतदान केल्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांना लाडक्या बहिणी योजनेचा पुन्हा फायदा होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, (Ratnagiri)जिल्ह्यात काही ठिकाणी कमी प्रमाणात झालेल्या मतदानामुळे सत्ताधारी नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी ६८.१४ टक्के मतदान झाले. यात महिलांनी जास्त मतदान केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात ४९,१९८ पुरुष तर ५२,२२७ महिलांनी मतदान केले आहे. महिलांच्या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करण्यात यश
राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेमुळे सत्ताधाऱ्यांना अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. या योजनेचा फायदा याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल, अशी आशा सत्ताधाऱ्यांना लागून राहिले आहे. या निवडणूकीत सत्ताधारी पक्षांच्या लोकांनी अचार सभाचा सपाटा लावला होता.
निकाल कुणाच्या बाजूने लागणार ? वळले लक्ष
मात्र, विरोधकांनी घराघरात जावून प्रचार केल्याने नागरिकांनी या प्रचाराला जास्त पसंती दर्शविली होती. याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे. जिल्ह्यात झालेल्या मतदानामध्ये गुहागर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक ७५.२६ टक्के तर सर्वात कमी मतदान पालकमंत्री उदय सामंतांच्या मतदार संघातील रत्नागिरी नगरपालिका क्षेत्रात झाले आहे.
एकूण ५५.०९ टक्के एवढे कमी मतदान झाल्याने महायुतीच्या नेत्यांचे हायटेन्शन वाढले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ
जिल्ह्यात २ हजार ८९६ बालिकांना ‘लेक लाडकी’ या योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली. त्यासाठी १ कोटी ४४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम लाभाथ्यर्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. लेक लाडकी योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…
ही योजना ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक, १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या बालिकांना या योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य दिले जाते. शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणे, कुपोषण कमी करणे, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा योजनेचा उद्देश आहे.






