...तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र
नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे याच महिन्यात 8 ते 10 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या सलग बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. याच काळात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा जागा वाटपाचा मुहूर्त सांगून टाकला. लाडकी बहीण योजनाही लवकरच बंद होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता ‘हा’ नेता फुंकणार ‘तुतारी’?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता
वडेट्टीवर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला घोटाळे करणारे महायुतीचे सरकार नको आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना सत्ता तर दूर राज्यात फिरणेही मुश्कील होणार आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी कधी कधी सत्य बोलतात. मध्य प्रदेशात अर्थ खात्याने लाडकी बहीण योजना चालू शकत नाही, असे सांगून चार महिन्यात बंद केली. महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुतीने लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजनाही बंद होणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
नवरात्रीमध्ये अधिकाधिक उमेदवारांची नावे आम्ही घोषित करणार आहोत. बऱ्याच जागांवर एकमत झाले आहेत. काही थोड्या थोड्या जागांवर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे दावे आहेत. त्याकरिता आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान मॅरेथॉन बैठका घेऊन वाद निकाली काढले जातील. 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा विषय कुठून आला हे माहिती नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. मैत्रीपूर्ण लढतीचा विषयच उपस्थित होत नाही.
हेदेखील वाचा : हरियाणात भाजपला मोठा धक्का! तासाभरापूर्वी भाजपसाठी मते मागत होते, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश