Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

11 तारखेला पुण्यातील लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद; ‘या’ पर्यायी मर्गाचा करा वापर

पादचारी दिनानिमित्त बुधवारी (११ डिसेंबर) लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2024 | 12:41 PM
11 तारखेला पुण्यातील लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद, काय आहे कारण?

11 तारखेला पुण्यातील लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद, काय आहे कारण?

Follow Us
Follow Us:

पुणे : पादचारी दिनानिमित्त बुधवारी (११ डिसेंबर) लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम चौक) ते गरुड गणपती चौक दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

पुणे महापालिकेकडून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ११ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चैाक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे असे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : तरुणीला VIDEO व्हायरल करण्याची भिती दाखवली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे –

लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नगरकर तालीम चौकातून डावीकडे वळून बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी शनिपार चौक (चितळे काॅर्नर) येथून वळून बाजीराव रस्तामार्गे अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. नारायण पेठेतील लोखंडे तालीम चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केळकर रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

11 डिसेंबर पादचारी दिन

देशात अनेक ‘दिन’ साजरे केले जातात. त्यात आता अजून एका दिनाची भर पडणार आहे. पादचारी दिन साजरा करणारं पुणे हे देशातील पहिलं शहर ठरणार आहे. सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हा देखील एक महत्वाचा घटक असतो. मोठ्या शहरांमध्ये रस्त्यालगत पादचारी मार्ग बनवलेले असतात. त्या पार्श्वभूमीवर पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं, त्याचं महत्व समजावं, या उद्देशानं पुणे महापालिका 11 डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करत असते.

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

बेशिस्त वाहन चालकांमुळे देखील या वाहतूक कोंडीत भर पडते. तर अपघाताला देखील निमत्रंण मिळते. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी ट्रिपलशिट, विरूद्ध दिशेने वाहने चालविणारे तसेच मोबाईल टॉकिंग अशांवर जोरदार कारवाई सुरू केली. वाहने देखील जप्त करण्यात येत होती. नंतर आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. आता थेट पोलिसांनी बेशिस्तांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात असून, यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यात धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांसह रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई केली जात आहे, असे दाखल गुन्ह्यांचे विश्लेषण केल्यावर दिसून येते.

Web Title: Lakshmi road in pune has been closed for traffic on 11th nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 12:34 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Neral Matheran Mini Train: माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा धावणार
1

Neral Matheran Mini Train: माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा धावणार

Matheran News: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानमध्ये प्रवासी घोड्यांची वाहतूक ठप्प होणार?
2

Matheran News: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानमध्ये प्रवासी घोड्यांची वाहतूक ठप्प होणार?

Diwali 2026: महागाईतही पुणेकरांची दिवाळी गोड, बाजारात खरेदीचा उत्साह; मिठाई, फराळाच्या दरांत तब्बल…
3

Diwali 2026: महागाईतही पुणेकरांची दिवाळी गोड, बाजारात खरेदीचा उत्साह; मिठाई, फराळाच्या दरांत तब्बल…

Maval Agricultural News: मावळात बाळा भेगडेंकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
4

Maval Agricultural News: मावळात बाळा भेगडेंकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.