Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : 2019 पासून जमिनीत भेगा, घरांना तडे; मोरेवाडीवर दरडसंकटाचे गडद सावट; ग्रामस्थांची आर्त हाक – ‘आमचं माळीण होऊ देऊ नका’

ठोसेघर परिसरातील मोरेवाडी गावावर संभाव्य दरडसंकटाचे सावट गडद झाले आहे. 2019 पासून जमिनीत मोठ्या भेगा पडणे आणि जमीन खचण्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा तोंडावर असताना “मोरेवाडीचे माळीण होऊ नये” अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 28, 2026 | 02:54 PM
2019 पासून जमिनीत भेगा, घरांना तडे; मोरेवाडीवर दरडसंकटाचे गडद सावट; ग्रामस्थांची आर्त हाक – ‘आमचं माळीण होऊ देऊ नका’

2019 पासून जमिनीत भेगा, घरांना तडे; मोरेवाडीवर दरडसंकटाचे गडद सावट; ग्रामस्थांची आर्त हाक – ‘आमचं माळीण होऊ देऊ नका’

Follow Us
Follow Us:
  • मोरेवाडीवर दरडीचे संकट
  • पावसाआधी पुनर्वसनाची ग्रामस्थांची आर्त मागणी
  • जमीन खचणे, खोल भेगा आणि भीतीच्या छायेत जीवन
  • प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात
सातारा : ठोसेघर परिसरातील दुर्गम मोरेवाडी गावावर संभाव्य दरडसंकटाचे सावट गडद होत असून, गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या जमीन खचण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१९ पासून गाव परिसरातील जमिनीत मोठ्या प्रमाणात भेगा पडत असून, काही ठिकाणी जमीन सरकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना “मोरेवाडीचे माळीण होऊ नये” अशी आर्त हाक ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी केंद्रीय पथकाने गावाची पाहणी करून अहवालही सादर केला होता. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. २०१४ मधील पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेचा संदर्भ देत, “तशी वेळ आमच्यावर येण्यापूर्वी शासनाने जागे व्हावे,” अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. मोरेवाडीतील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून परिसरातील शेतजमिनीमध्येही खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक कुटुंबांना भीतीच्या छायेखाली दिवस काढावे लागत आहेत. “कधी डोंगर कोसळेल आणि जीवितहानी होईल, याची शाश्वती नाही,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल

गावातील बहुतांश नागरिक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. त्यामुळे पुनर्वसन करताना गावाजवळच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेती, जनावरे आणि मुलांचे शिक्षण यांचा समतोल राखता येईल, अशी मागणी पुढे आली आहे. दुर्गम भाग असल्याने रोजगाराची इतर साधने उपलब्ध नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

महिला, वृद्ध आणि शेतकरी यांनी भावनिक शब्दांत प्रशासनाकडे मदतीची याचना केली. “आमच्याकडे ना राजकीय पाठबळ आहे, ना आर्थिक ताकद. दुर्घटना घडण्यापूर्वी शासनाने हस्तक्षेप करावा,” अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी भूगर्भतज्ज्ञांकडून नव्याने सर्वेक्षण करून गाव सुरक्षित आहे की नाही याचा अहवाल जाहीर करावा, तसेच तातडीने पुनर्वसनाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संभाव्य उपाययोजनांची गरज
मोरेवाडी परिसराचे तातडीने भूगर्भीय सर्वेक्षण
भूस्खलनप्रवण क्षेत्राचा वैज्ञानिक अहवाल सार्वजनिक करणे
धोकादायक घरांचे तात्पुरते स्थलांतर
गावाजवळच पुनर्वसनासाठी पर्यायी जागेची निवड
शेती व पशुपालनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे
आपत्ती व्यवस्थापन पथक आणि सतर्कता यंत्रणा सक्रिय करणे
पावसाळ्यापूर्वी संरक्षणात्मक उपाययोजना राबविणे

Mumbai News: कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करा! मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश, विविध चौक्यांची पाहणी करून केल्या सूचना

Web Title: Landslide threat looms over morewadi village near thoseghar residents demand action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • maharashtra
  • Monsoon Update
  • Satara

संबंधित बातम्या

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान
1

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड
2

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल
3

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली
4

मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.