Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kashedi Tunnel: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? मग ‘ही’ बातमी वाचाच…

गेल्या वर्षी कशेडी बेगद्याच्या सुरुवातीच्या भागात होंगर कपारीतून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या घटनेमुळे महामागांवरील एक लेन अनेक तास बंद ठेवावी लागली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 15, 2025 | 02:26 PM
Kashedi Tunnel: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? मग 'ही' बातमी वाचाच...

Kashedi Tunnel: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? मग 'ही' बातमी वाचाच...

Follow Us
Close
Follow Us:

रॉक बोल्टिंग व तारेची जाळी बसविण्याचे काम वेगात
दरड कोसळून होते वाहतूक विस्कळीत
वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत

खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या भूस्खलनामुळे वाहतूक खोळंबण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील या अतिसंवेदनशील भागात दरड कोसळल्याने महामार्ग तासन्तास बंद पडत असल्याने प्रवासी, स्थानिक नागरिक व मालवाहतुकीला मोठा फटका बसत होता. या पाश्र्वभूमीवर भूस्खलनाचा धोका कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार केंद्र शासनाने या कामाला प्राधान्य दिले असून, उत्तराखंड येथील केंद्र शासनाची नामांकित संस्था तेहरी हायड्रो इलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून कशेडी बोगद्याच्या परिसरात डोंगर उतारांवर रॉक बोल्टिंग तसेच तारेची संरक्षक जाळी बसविण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.

वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत

या कामांत डोंगर कड्‌यांतील सैल खडक आणि माती विशेष तंत्रज्ञानाच्या साहाच्याने लोखंडी बोल्टद्वारे घट्ट बांधून ठेवण्यात येत असून त्यावर मजबूत तारेची जाळी बसविण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात – होणाऱ्या अतिवृष्टीदरम्यान माती व दगड घसरून रस्त्यावर कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कशेडी बोगदा परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

‘या’ महामार्गासाठी दुकाने पाडली, आता पुढे काय?; तब्बल 22 दिवस झाले तरी देखील…

दरड कोसळून होते वाहतूक विस्कळीत

गेल्या वर्षी कशेडी बेगद्याच्या सुरुवातीच्या भागात होंगर कपारीतून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या घटनेमुळे महामागांवरील एक लेन अनेक तास बंद ठेवावी लागली होती, तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळल्याने यहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

या घटनांमुळे प्रवाशाना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. सध्या सुरू असलेल्या रॉक बोल्टिंग व संरक्षक जाळी बसविण्याच्या कामामुळे भविष्यात अभा प्रकारच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून या कामावर नियमित देखरेख ठेवण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी हे काम मोठचा प्रमाणात पूर्ण करण्यावा प्रयत्न सुरू आहे. या उपाययोजनांमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कर्शडी बोगदा परिसर प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित ठरणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Landslides in kashedi tunnel will stop relief for passengers mumbai goa highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • highway
  • National Highways
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट
1

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

‘लालपरी’ला आले सोन्याचे दिवस! सहलीच्या हंगामाने ST ला फायदा; महामंडळाला 10 कोटी…
2

‘लालपरी’ला आले सोन्याचे दिवस! सहलीच्या हंगामाने ST ला फायदा; महामंडळाला 10 कोटी…

Crime News: आंबा घाट परिसरात मानवी हाडे अन्…;  राकेश खून प्रकरणात मोठा उलगडा
3

Crime News: आंबा घाट परिसरात मानवी हाडे अन्…; राकेश खून प्रकरणात मोठा उलगडा

Ratnagiri News: कोकण सागरी महामार्ग कधी पूर्ण होणार? प्रतीक्षा कायम
4

Ratnagiri News: कोकण सागरी महामार्ग कधी पूर्ण होणार? प्रतीक्षा कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.