Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा… महिलेची २२ लाखोंची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून एका बँकेत कार्यरत असलेल्या चाळीस वर्षीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 27, 2026 | 04:06 PM
Latur Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा… महिलेची २२ लाखोंची फसवणूक (फोटो सौजन्य: social media)

Latur Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा… महिलेची २२ लाखोंची फसवणूक (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नाच्या आमिषाने बँक महिला अधिकाऱ्यावर अत्याचार
  • लाखोंची फसवणूक; गुन्हा दाखल तपास सुरू
  • पीडित महिलेकडून तक्रार दाखल
Latur Crime News: लग्नाचे आमिष दाखवून एका बँकेत कार्यरत असलेल्या चाळीस वर्षीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपीने केवळ शारीरिक शोषणच केले नाही, तर महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. ऑगस्ट २०१८ ते जानेवारी २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. हाडको कॉलनी परिसरातील रहिवासी खुर्शीद अफसर पटवारी याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले.

हे देखील वाचा: Dharashiv Health Department: धाराशिव आरोग्य विभागात गैरप्रकार? कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा आ. हेमंत ओगलेंनी केला आरोप

सध्या पीडित महिला गुजरातमध्ये एका बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर विश्वास संपादन करून टप्प्याटप्प्याने १३ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख २५ हजार रुपयांची रोकड घेतली.

२२ लाख रुपयांचे कर्ज स्वतःच्या खात्यावर वळविले
आरोपीने पीडितेच्या नावावरून कोटक महिंद्रा व एचडीएफसी बँकेतून तब्बल २२ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढायला लावले आणि ती रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय, पीडित महिलेच्या घराची मूळ कागदपत्रेही आरोपीने स्वतःकडे ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: Latur News: लातूर जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा विळखा कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड; परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव

वैयक्तिक संबंध उघड करून बदनामीची धमकी
पीडितेने या प्रकाराला विरोध केल्यावर आरोपीने त्यांचे वैयक्तिक संबंध उघड करून बदनामी करण्याची धमकी दिली. पैशांची मागणी करून खंडणीही मागितली. या प्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी, खंडणी व फसवणूक अशा गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: In latur lured with a marriage promise trapped in a romance scam woman cheated out of 22 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Accident News: सातारा-लातूर महामार्ग की ‘मृत्युमार्ग’? माण तालुक्यातील पळशी फाट्यावर भीषण अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी
1

Accident News: सातारा-लातूर महामार्ग की ‘मृत्युमार्ग’? माण तालुक्यातील पळशी फाट्यावर भीषण अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी

Latur Crime News: तोतया पोलिस अडकला जाळ्यात; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Latur Crime News: तोतया पोलिस अडकला जाळ्यात; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा विळखा कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड; परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव
3

लातूर जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा विळखा कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड; परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.