Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या बुधवार दिनांक २ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांचे सकाळी ११ वाजता नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2026 | 04:59 PM
राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Follow Us
Follow Us:

नाशिक : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या बुधवार दिनांक २ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक येथील MTDC रिसॉर्टमध्ये संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर २४ ऑगस्टपासून सुरु आहे. बुधवार दिनांक २ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप होणार आहे.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री काँग्रेस वर्किंग कमिटाचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, रेहाना चिश्ती, डॉ. विश्वजित कदम, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी  यांच्यासह वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

राहुल गांधी यांचे सकाळी ११ वाजता नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते शिबिराला उपस्थित राहून जिल्हा अध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. तसेच जागतिक राजकारण व भारत या विषयावर राहुल गांधी भाषण करतील, यावेळी ते आदिवासी शिष्टमंडळाशी तसेच राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील व संध्याकाळी दिल्लीला प्रयाण करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसने दिली आहे.

हे सुद्धा वाचा : चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

छात्रों की गूंज कार्यक्रमाची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाची चर्चा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशभरातील तरुणाईशी संवाद साधत आहेत. पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात फक्त हजारो तरुणींना सहभाग नोंदवला होता. राहुल गांधींच्या पुण्याच्या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा झाली. त्यांनी या कार्यक्रमात देशात महिलांची स्थिती गंभीर आहे, असा आरोप केला. महिलांना करिअरची संधी दिली जात नाही. महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, असा आरोप केला आहे.

Web Title: Leader of the opposition in the lok sabha rahul gandhi is visiting nashik tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Congress
  • MP Rahul Gandhi
  • Nashik

संबंधित बातम्या

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!
1

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर
2

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
3

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल
4

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.