
Leaders meet Nitin Gadkari for development of Jambhulwadi tourist spot in Parbhani
Jambhulwadi : परभणी : सीमेवर गोदावरी नदीच्या मध्यभागी बमालेले निसर्गसौदयांनी नटलेले जांभुळबेट हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांना गती गती देण्या देण्यासाठी जांभुळबेट संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रगतशिल शेतकरी कांतराव देशमुख इस्सीकर यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच नागपूर येथे विशेष भेट घेत विकास आराखडा मांडला यामुळे जांभूळबेट विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूरला झालेल्या भेटीत जांभुळबेट संवर्धन समिती अध्यक्ष कृषीभूषण कोतराव इरीकर यांनी जांभुळभेट विकास आराखड्याबाबत चर्चा करून आवश्यक निधी, पायाभूत सुविधा, नदीपात्रातील प्रवेशमार्ग, पर्यटन सुविधा, पर्यावरणसंवर्धन उपक्रम तसेच विविध प्रशासकीय अडचणी दूर करण्याबाबत गडकरी यांच्याकडे मागणी केली. दरम्यान गडकरी यांनी कौतुकासह सकासात्मक प्रतिसाद दिला. या भेटीत डॉ. सुशील शिंदे यांनी मंत्री गडकरी यांच्यासमोर विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जांभुळबेट विकास आराखड्याविषयी सादर केलेल्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका मांडली, त्यांनी शक्य त्या सर्व बाबीमध्ये मार्गदर्शन व सहकार्याचे आश्वासन दिल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जांभुळबेट संवर्धन समितीच्या वतीने मंत्री नितीन गडकरी यांना जांभुळबेटाची विशेष प्रतिकृती भेट देऊन सन्मान करण्यात आला, याप्रसंगी मंत्री गडकरी यांनी जांभुळबेटाला येऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही समितीकडून सांगण्यात आले. यावेळी जांभळबेट संवर्धन समितीचे डॉ. सुशील शिंदे, डॉ. गिरीश चरडे, डॉ. लोकेश बेरबोशी उपस्थित होते. समितीने आगामी काळात जांभुळबेटला आदर्श पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पर्यटन विकासाला चालना मिळण्याची चिन्हे
परभणी जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यांच्या सीमेवर असलेले जांभुळबेट हे गोदावरी नदी पात्रातील दुर्मिळ नैसर्गिक बेटांपैकी एक आहे. शांत, हिरवाईने नटलेले वातावरण, जैवविविधता व नदीकाठी असलेली रमणीयता यामुळे से ठिकाण पर्यटन दृष्टीने मोठी क्षमता बाळगते. येथे मूलभूत सुविधा उभारल्यास रोजगार, स्थानिक उत्पादनांची विक्री, बोटिंग, निसर्गभ्रमण आदी उपक्रमांना मोठी चालना मिळू शकते.