परभणी मध्ये सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शेकडो उमेदवार रिंगणात उतरले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Elections: परभणी : जिल्ह्यातील जिंतूर, पलू, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, पूर्णा या सात नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगराध्यक्षपदासाठी ११७ तर नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ७ नगराध्यक्ष आणि १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. जिल्ह्यात केवळ पूर्णा व गंगाखेड नगर पालिकेत चौरंगी लढत होणार असून इतर ठिकाणी तिरंगी, दुरंगी लढती रंगण्याची चिन्हे दाखल उमेदवारीवरून दिसत आहेत.
अपक्षांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले असले तरीही त्यात दिग्गज उमेदवारांचा समावेश नाही. युती, आघाडी होण्याची वाट पाहण्यात जिल्ह्यात सर्वच पालिकांमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय उत्सुकता ताणली गेल्याचे पहायला मिळाले. शेवटी यामध्ये भाजप व एकनाथ शंदे यांच्या शिवसेनेने काही ठिकाणी एकमेकांशी युती केली. मात्र उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गटाचा काँग्रेससोबत समन्वय दिसून आला नाही. त्यामुळे या दोन पक्षांना अनेक ठिकाणी उमेदवार देतानाही अडचण झाली, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाथरी विधानसभा वगळता इतरत्र सोयीनुसार भूमिका घेतल्याचे पहावयास मिळाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रमुख समभागांचा आढावा
गंगाखेडात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अर्ज भरण्यासाठी शक्त्ती प्रदर्शन करण्यात आले. सोनपेठ येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करून नगर पालिकेसाठी अर्ज दाखल करण्यात आले.
सर्वच पक्षांत सर्वांनाच उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने काही जणांनी इतर पक्षाकडून उमेदवारी भरण्यापेक्षा अपक्ष म्हणून अर्ज भरला. यामुळे सध्या असलेल्या सहा प्रमुख पक्षांकडे उमेदवारांची गर्दी होईल असे वाटले होते, परंतु तसे झालेले नाही. दुसऱ्या पक्षाचा सहारा घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून लढण्यालाच पसंती दिली जात आहे. पक्षाचे नाव टाकून अर्ज न भरल्याने अशांना आता ऐनवेळी पक्षाकडून उमेदवारीही घेता येणे शक्य होणार नाही.
पायरीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस व शिंदेसेनेच्या लढतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने उडी घेतल्याने तिरंगी लढत होणार आहे.
जिल्ह्यात प्रमुख पक्षाची माघार कुठे होईल, याची शक्यता नसली तरीही जेथे आघाडी व युतीची बोलणी ठरली अशा ठिकाणी मात्र माघारी दिसतील. इतरत्र फक्त अडचणीचा ठरेल, अशा अपक्षांनाच माघारीसाठी गळ घातली जाईल, असे चित्र आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गुट्टेच्या आघाडीला आव्हान
परभणी जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत प्रमुख राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या अर्जानुसार दुरंगी, तिरंगी लढतीचीच चिन्हे आहेत. गंगाखेडात मात्र आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेनेच्या आघाडीसमोर काँग्रेस, भाजपसह राकाँ अजित पवार गटही लढतीत आहे. त्यामुळे या एकाच ठिकाणी चौरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत. असाच प्रकार पूर्णा पालिकेतही असून उद्धवसेना, काँग्रेस व शिंदेसेनेचा उमेदवार गुट्टेच्या आघाडीला आव्हान देईल.
जिंतूरमध्ये भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट या पारंपरिक स्वरूपाच्या पालकमंत्री मेधना बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे यांच्यातील लढतीत ऐनवेळी काँग्रेसने उडी घेतली आहे. याठिकाणी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मुस्लिम उमेदवार दिला आहे. सोनपेठला आमदार राजेश विटेकर यांच्या राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय एकत्रित येण्याचे संकेत आहेत. तर मानवतलाही तीच स्थिती असून येथे मात्र भाजपने शिंदेसेनेच्या मागे बळ उभे केले.






