
निवडणुका संपताच बिबट्याची एन्ट्री; शेत, शिवार सोडून थेट मनुष्यवस्तीत..., कुठे झाले दर्शन?
शहरात मनुष्यवस्तीत बिबट्या दिसल्याने खळबळ
बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न सुरू
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
शिरुर: शिरुर शहरात ऐन निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये मनुष्यवस्तीत बिबट्या निदर्शनास आल्याने खबाल उडाली असून वनविभागाच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
शिरुर शहरातील जोशीवाडी येथे रात्री अकराच्या सुमारास मनुष्यवस्तीत बिबट्या निदर्शनास आला, याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनरक्षक गणेश झिरपे, जालिंदर सानप, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. अविनाश विसळकर यांसह आदींनी जोशीवाडी येथे बिबट्याचा शोध सुरु केला मात्र मानवी वस्ती जास्त घरे, अंधार व अरुंद बोळी असल्याने बिबट्याला शोधण्यासाठी अडथळा निर्माण होत होता.
Leopard News: मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत; जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका…
अखेर पहाटेच्या सुमारास बिबट्या निदर्शनास आल्याने खबरदारीच्या हेतूने बिबट्याला नदीच्या बाजूने हुसकावण्यात आले, तर सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सदर परिसरातील पांजरपोळ भागात एक व बाजूला दोन पिंजरे लावण्यात आलेले असून बिबट्याचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोध घेण्यात येणार असल्याचे सांगत परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, रात्रीच्या वेळी घराबाहेर उजेड ठेवावा असे आवाहन शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.
‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत
राजापूर तालुक्यात पेंडखळे, सागवे, केरवण, भू भानवली, नाटे, तुळरावडे, शिवणे, वहदहसोक, कोडडे, ओणी, वाटूक, आडिवरे, ताम्हाण, रत्नागिरी तालुक्यात जाकादेवी परिसर, जयगड, साडेलवण, कोतवडे, करबुडे, हातखंबा, फणसवळे, निवली, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निपैडी, भगवंतीनगर, नेवरे, जाकादेवी, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, ठंडी, वरवते, मालगुड, भंडारपुळे जावरुण, भोके, रत्नागिरी परिसरात खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरवेरी, टिके, टैभ्ये नावणे, जुचे, करला, फणसोप, कोळंबे, गोळए, गावखडी, मेवीं, पूर्णगड, गावडेआबरें, दाभिल, आंजारी, मावळंगे, हातिस, विवखरी, सोमेश्वर, बाळके, केळवणे, चरबेली, डोळस, कुवारबाव, मिरजोळे या गावांचा समावेश आहे.
Leopard News: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडले खरे पण…; देवरुखमध्ये घडले काय?
श्वानांवर, जनावरांवर माणसांवरही हल्ले सुरूच
त्यामुळे बिबटे आता पक्षाच्या शोधात बेट मानवी वस्तीमध्ये शिरत आहे आणि त्याचे हे प्रमाण वाढत आहे. वारंवार कुत्र्यावर, जणावरावर आणि कधी कधी माणसांवरही हल्ले झाल्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे बिबट्धाची या भागांमध्ये प्रचंड दहशत निर्माणा झाली आहे, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बदर असलेल्या गादांची नाचे जाहीर केली आहेत.