देवरुखमध्ये आढळला बिबट्या (फोटो- सोशल मीडिया)
देवरूखमध्ये आढळला बिबट्या
न्युमोनिया झाल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत निष्पन्न
माहिमत पिजराबद; काही तांसातच मृत्यू
देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरुख गावात गेले अनेक दिवस धुमाकुळ घातलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आहे. मात्र काही तासातच या बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याला त्वचा रोग व न्युमोनिया झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाशी करंडेवाडी येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मोरीमध्ये ग्रामस्थांना बिबट्या दिसून आला. याची खबर तत्काळ वनविभागाला देण्यात आली. वनपाल सागर गोसावी व वनरक्षकांनी तत्काळ पिंजरा घेवून घटनास्थळी दाखल झाले. तीन तासाच्या मोहिमेंनंतर बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यात वनविभागाला यश आले. या प्रक्रियेमध्ये वनविभागाला ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले. त्यांनतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज शेट्ये यांनी तपासणी करून शवविच्छेदन केले. बिबट्या मादी जातीची ४ बर्षे वाढीची होती. मादीला त्वचा रोग झाला होता. तसेच न्युमीनिया झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉ. शेट्ये यांनी स्पष्ट केले.
Leopard News: मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत; जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका…
रत्नागिरीतील ‘या’ तालुक्यात वाढला बिबट्यांचा वावर
तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र असून येथे मोठी व दाट जंगलेआहेत. ही जंगले वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास मानली जातात. मात्र गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड, ओसाड होत चाललेले डोंगर, बेकायदा उत्खनन, वाढती शिकार, जंगलातील पाणीस्रोतांचा हास आणि मानवी वावरात झालेली वाढ यामुळे (Leopard)वन्यप्राणी थेट मानवी वस्तीत येण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणात मोठी धरणे,जलाशय व अनेक नद्यांच्या काठावर दाट जंगलांचा पट्टा आहे. याच परिसरातलाहान-मोठी गावेच वाड्यावस्त्या वसलेल्या असून येथील नागरिकांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून शेळीपालन, आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन हे जोडधंदे मोठ्या प्रमाणावर केले जातात. भात, कडधान्ये तसेच खरीप व रब्बी ग्रामीण व दुर्गम भागांनाही बसत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, ग्रामस्थ संतप्त; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना
मानवनिर्मित कारणाने वन्यप्राणी नागरी वस्तीत
वृक्षतोडीमुळे जंगल क्षेत्र झपाट्याने कमी होत वृक्षारोपणाचे उपक्रम केवळ फोटोसेशन व प्रसिद्धीपुरते मर्यादित राहिले असून, लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन न केल्याने मोजकीच झाडे तग धरत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. अनेक ठिकाणी वृक्षतोड हा सरळ व्यवसाय बनला असून, यात काही वनरक्षकांचा सहभाग असल्याच्या चचर्चाही रंगू लागल्या आहेत.






