(फोटो- सोशल मीडिया)
वाडी परिसरातही बिबट्याचा मुक्त संचार वाढला
सातत्याने होणारा वावर ग्रामस्थ झाले भयभीत
रत्नागिरी जिल्ह्यात वाढला बिबट्याचा वावर
रत्नागिरी: रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या वावराने आणि हल्ल्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. विशेषतः, रत्नागिरीमधील मिरजोळे येथील सोनारवाडी भागातील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरांना ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यापैकी एका गुराचा बिबट्याने फडशा पाडला आहे, हे गुरे जंगलात चरण्यासाठी सोडलेले असताना बिबट्याने हल्ला केला.
मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेवी माहिती मिळताच ग्रामपंचायत रत्नदीप पाटील यांनी तत्काळ वनविभागाला याची खबर दिली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मेलेल्या गुरांचे दफन करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून मिरजोळे, मुक्त सार, शिळ या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे. येथे अनेकदा गुरे, शेळ्या आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, ग्रामस्थ संतप्त; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना
चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी शिकार होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आंबा बागायतीमध्ये काम करणाच्या गुराख्याना अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्यांच्यातही मोठी भीती आहे. ३ वर्षांपूर्वी गावातील माळरानावर सडलेल्या अवस्थेत एक बिबट्याही आढळून आला होता. तर अलिकडे मिरजोळेला लागून असलेल्या खेडशी येथील डफळोळ वाडी परिसरातही बिबट्याचा मुक्त्त संचार वाढला आहे. या वाडीत ग्रामस्थांव्या घराच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू
जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबायला तयार नाही. पिंपरखेड येथील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव मंगरूळ येथे भरदिवसा साडेअकरा वाजताच्या सुमारास कांदा काढणीचे काम सुरू असताना शेताच्या बांधावर एका आठ वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हृदयद्रावक घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Satara: ऊसाच्या शेतात चार पाय कापलेल्या मादी बिबट्याचा सापडला मृतदेह; 18 नखे गायब
रोहित बाबू कापरे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर, “जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत मृतदेह दवाखान्यातून हलवणार नाही,” अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. पारगाव येथे श्रीराम भिकाजी भोर यांच्या शेतात कांदा काढणीसाठी आलेल्या मजुरांचा मुलगा रोहित कापरे हा शेताच्या बांधावर बसला होता. याचवेळी परिसरातील ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधून रोहितवर हल्ला केला. त्याला ऊसाच्या शेतात ओढत नेले. यावेळी महिला मजुरांनी ऊसाच्या शेतात शिरून बिबट्याच्या तावडीतून सोडवून पारगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतु या हल्ल्यात रोहित हा गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.






