गोंदिया : काल गोंदिया जिल्ह्यामधील देवरी तालुक्यातील देवरी आमगाव रोडवरील वडगाव या गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. वनविभागाला माहिती मिळाली आहे की, तीन बिबट्यांना करंट लावून मारल्याची घटना घडली आहे. वनविभाला यासंदर्भामधील माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या तीन बिबट्यांना तीन ते चार दिवसांआधी मारण्यात आले होते आणि या विषयी वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे पथक आज सकाळी या ठिकाणी झालं दाखल झाले. सदर जंगलाची जागाही एफडीसीएमच्या अंतर्गत असून याविषयी एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
त्यापूर्वी वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील आठ आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वीच सालेकशा तालुक्यात वाघाची शिकार करण्यात आली होती आणि आता तीन बिबट्यांना करंट लावून शिकार करण्यात आली असल्यामुळे वन्य प्राणी सुरक्षित नसल्याचे गोंदिया जिल्ह्यात दिसून येत आहे.
याचसंदर्भात उपवनसंरक्षक जी.एस. राठोड यांनी माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले, काल वनविभाच्या कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली. घटनेच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली आणि त्याठिकाणी ३ बिबटे मृत अवस्थेत आढळले. यासंदर्भात काही संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे. याबाबतीत पुढील कारवाई सुरु आहे. ही २६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे असे आरोपीना पोलिसांना सांगितले आहे अशी माहिती उपवनसंरक्षक जी.एस. राठोड यांनी दिली आहे.